हिवाळ्यात आजारी पडणार नाही, आजपासूनच सुरु करा ‘हे’ उपाय

हिवाळ्याची सुरुवात झाली असून वातावरणातील गारवा वाढला आहे. अशावेळी प्रत्येकाने स्वत:ला फिट ठेवणं खूप गरजेचं आहे. हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेऊयात.

हिवाळ्यात आजारी पडणार नाही, आजपासूनच सुरु करा 'हे' उपाय
Follow us
| Updated on: Nov 07, 2024 | 10:00 AM

नोव्हेंबर महिना म्हटलं की थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. काही दिवसांपासूनच बाहेरील वातावरणात बदल झाल्याचे पाहिला मिळतंय. आपल्याला आता थोडी थंडी देखील जाणवू लागली आहे. हवामानाच्या अंदाजानुसार उत्तर भारतात येत्या आठवड्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. त्यात आता हिवाळा ऋतूचे आगमन झाल्याने प्रत्येकाने आपल्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. आयुर्वेदानुसार हिवाळा हा असा ऋतू आहे ज्यामध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढते. थंड हवामानात आपल्या शरीराचे तापमान कमी होते आणि नवीन हवामानाशी जुळवून घेण्यासाठी शरीर थर्मोरेग्युलेशन करते.

थंडीची सुरुवात झाली असून असाह्य उकाड्यापासून आता सुटका होऊ लागली आहे. त्यामुळे बाहेरील वातावरणात बदल होऊ लागलेत. बदलत्या ऋतूमुळे आता काही साथीचे आजार डोके वर काढतात. विशेषतः लहान मुलं व वयस्कर व्यक्तींना याचा सर्वाधिक धोका आहे. पण तुम्ही योग्य खबरदारी घेऊन निरोगी रहाण्यासाठी हे घरगुती उपाय केले तर हिवाळा ऋतूचा आनंदही घेऊ शकता. कोणते उपाय आहेत चला तर मग जाणून घेऊयात.

निरोगी आहार घ्या.

थंडीच्या दिवसात निरोगी राहण्यासाठी योग्य पद्धतीने आहार घेणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे तुमच्या आहारात धान्य, मांस, मासे, शेंगदाणे, सुका मेवा, औषधी वनस्पती, मसाले, ताजी फळे आणि ताज्या भाज्या त्याचबरोबर हंगामी फळे व भाज्या यांचा तुमच्या आहारात समावेश करून घेतल्यास व योग्य पद्धतीने समतोल आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते. या दिवसांमध्ये व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचे अधिक सेवन करू शकतो कारण यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

नियमित व्यायाम करा.

हिवाळ्यात स्वत:ला फिट ठेवण्यासाठी नियमित व्यायाम करणे फार महत्वाचे आहे. यासाठी तुम्ही दररोज योग करा, धावणे, चालणे किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग जे तुमच्या स्नायूंना बळकट बनवण्यासाठी मदत करतात असे व्यायामाचे प्रकार तुम्ही केल्यास तुमचे शरीराला उबदार राहते. यामुळे ताप किंवा सर्दीसारख्या आजारांपासून बचाव करताना रोगप्रतिकारशक्ती ही मजबूत होईल.

मॉयश्चरायझर लावणे

आपल्या सर्वाना थंडीच्या दिवसात त्वचेच्या समस्यांना सामोरे जावेच लागते. हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा कोरडी पडते व त्याने आपल्याला खाज येते. त्याच बरोबर आपले ओठ फुटतात. त्यामुळे तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी दररोज मॉयश्चरायझर लावायला विसरू नका.

पाणी प्या

हिवाळाच्या दिवसात बाहेरील वातावरणात थंडावा असल्याने आपल्याला तहान कमी प्रमाणात लागते. त्यामुळे आपल्या शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे थंडीच्या दिवसात भरपूर पाणी प्या आणि हायड्रेटेड रहा. पाणी आपलं शरीर स्वच्छ करण्यास आणि विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करतं. तसंच शरीराच्या पेशींमध्ये पोषक द्रव्ये वाहून नेण्यासाठी आणि शरीरातील पोषक द्रव्य संतुलित करण्यासाठी मदत करत असतं.

पुरेशी झोप घ्या 

चांगली झोप आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती निरोगी ठेवण्यास मदत करते. तसेच आपले शरीराचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे किमान ७-८ तास चांगली झोप घ्या.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.