स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे शिवाचे ‘अर्धनारीश्वर’ रूप, वाचा भृंगीची कथा…

महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे ‘भृंगी’ हे रूप धारण करावे लागले होते.

स्त्री आणि पुरुष समानतेचा संदेश देणारे शिवाचे ‘अर्धनारीश्वर’ रूप, वाचा भृंगीची कथा...
महादेवाचे अर्धनारीश्वर रूप
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 11:12 AM

मुंबई : महादेवाच्या अर्धनारीश्वर स्वरूपाबद्दल सर्वांना माहिती आहे, पण तुम्हाला माहिती आहे काय की महादेव आणि माता भगवती यांना एका भक्ताच्या अवास्तव हट्टामुळे ‘भृंगी’ हे रूप धारण करावे लागले होते. जगात स्त्रिया आणि पुरुष दोघांचे स्वतःचे स्थान आहे, कोणीही कुणापेक्षा कमी नाही किंवा कोणीही कुणापेक्षा जास्त नाही, हा संदेश त्यांनी जगाला दिला. दोघांच्या एकत्रीकरणानेच हे घर चालते. चला तर, त्यासंबंधित पौराणिक कथांबद्दल जाणून घेऊया…(Story of ardhanarishwar form of shiva and bhrungi)

भृंगीची कथा

‘भृंगी’ हा महादेवांचा परम भक्त होता. मात्र, तो नेहमीच माता भगवतींना महादेवापेक्षा वेगळी मानत असे आणि केवळ शिवाचीच पूजा करत असे. आपल्या आराध्याची भेट घेण्यासाठी तो एकदा केलासावर पोहोचला. नेहमीप्रमाणे, आदिशक्ती मां जगदंबा महादेवच्या डाव्या बाजूस विराजमान होत्या. महादेव समाधी अवस्थेत होते आणि माता जगदंबा चैतन्याव्यस्थेत होत्या. माता जगदंबाचे डोळे उघडे होते.

भृंगी शिवप्रेममध्ये लीन झालेले होते आणि त्यांना केवळ शिवाभोवती परिक्रमा करायची होती. कारण त्याची ब्रह्मचर्यची व्याख्या वेगळी होती. आपल्या अत्यानंदात, आपल्याला केवळ महादेवाभोवतीच प्रदक्षिणा घालायची आहे, असे म्हणत त्याने मातेला शिवजींपासून विभक्त होण्याची विनंती केली. माता जगदंबाला हे समजले की, तो तपस्वी आहे, परंतु अद्याप त्याला ज्ञानप्राप्ती झालेली नाही. त्यांनी भृंगी याला समजावून सांगितले की, मी महादेवाची शक्ती आहे, मी त्यांच्यापासून विभक्त होऊ शकत नाही. पण भृंगी समजण्यास तयार नव्हटा. त्याने आपल्या मनाप्रमाणे प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्पाचे रूप धारण केले आणि तो शिवाभोवती फिरू लागले.

आणि शिवाची समाधी भंग झाली!

जगदंबा आणि महादेव यांच्या मधून जात प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न तो करत होता. तेव्हा शिवाची समाधी भंग झाली आणि महादेवाच्या लक्षात आले की, माझ्या डाव्या अंगावर जगदंबा पाहून तो विचलित झाला आहे. आपल्या भक्ताला समजावण्यासाठी शिवाने अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि माता जगदंबा त्यांच्यात विलीन झाल्या.

परंतु, भृंगीला देवाचा संदेश समजला नाही आणि आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी त्याने उंदराचे रूप धारण केले आणि अर्धनारीश्वर रूपाला एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला. शिवभक्त भृंगीचा हट्ट निरंतर सहन करणाऱ्या माता जगदंबाचा संयम अखेर तुटला आणि त्यांनी भृंगीला शाप दिला (Story of ardhanarishwar form of shiva and bhrungi).

माता जगदंबाचा शाप

हे भृंगी, तू विश्वाच्या मूलभूत नियमांचे उल्लंघन करत आहेस. जर तू मातृशक्तीचा आदर न करण्याबद्दलच्या आपल्या जिद्दीवर ठाम असशील, तर आत्ता तुझ्या आईचा अंश तुझ्या शरीरापासून वेगळा होईल. हा शाप ऐकून स्वत: महादेव अस्वस्थ झाले. कारण शरीरविज्ञानाच्या यांत्रिकीय स्पष्टीकरणानुसार, मानवी शरीरातील हाडे आणि स्नायू वडिलांकडून भेटतात, तर रक्त आणि देह आईच्या वाट्यामधून प्राप्त होतो.

या शापानंतर, भृंगीची प्रकृती खराब झाली आणि रक्त-मांस त्वरित त्याच्या शरीरांपासून विभक्त झाले. त्याच्या शरीरात फक्त हाडे आणि स्नायू उरले होते. या शापानंतर, भृंगी असह्य वेदनांमध्ये पडला, मग त्यांना समजले की पुरुष आणि स्त्रिया दोघांचेही स्थान समान आहे, आपण त्यांना भिन्नतेच्या दृष्टीने पाहू नये. आपण या दोघांचाही आदर केला पाहिजे.

यानंतर, असह्य वेदनांनी ग्रस्त भृंगीने जगदंबाला प्रार्थना केली, त्यानंतर मातेने त्याला क्षमा केली आणि त्याचे दुःख नाहीसे करण्यासाठी, तिने आपला शाप मागे घेण्यास सुरुवात केली. मात्र, भृंगीने त्यांना रोखले आणि सांगितले की, आई माझे दु:ख दूर करून माझ्यावर खूप दया केली आहे. परंतु, मला याच स्वरूपात राहू दे जेणेकरून माझे हे रूप जगासाठी एक उदाहरण बनेल, जे लोक पुरुष आणि स्त्रियांमध्ये फरक करतात अशा लोकांचे काय होते, हे त्यांना कळेल.

गणांमध्ये प्रमुख स्थान!

आपल्या भक्ताचे हे बोलणे ऐकून महादेव आणि माता जगदंबा दोघेही त्याच्यावर खुश झाले. आई जगदंबा आणि महादेव यांनी अर्धनारीश्वर रूप धारण केले आणि भृंगीला त्यांच्या गणांमध्ये प्रमुख स्थान दिले. मग महादेव म्हणाले की आता या रूपात तुमची उपस्थिती या जगाला एक संदेश असेल की स्त्री व पुरुष यांच्यात भेद करणार्‍याचा गत तुमच्यासारखी होईल. हे जग पुरुष आणि स्त्रिच्या मिलनानेच पुढे जाते. दोघांचे स्वतःचे स्थान आणि स्वतःचे वेगळे अस्तित्व आहे.

(Story of ardhanarishwar form of shiva and bhrungi)

हेही वाचा :

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.