नवरा-बायकोच्या नात्यात किती आणि कोणते गुण असावेत?; माहीत असायला हवं बरं

लेखात यशस्वी वैवाहिक जीवनासाठी पाच महत्त्वाचे गुण सांगण्यात आले आहेत. एकमेकांचा सन्मान करणे, प्रेमळ राहणे, पार्टनरच्या इच्छांना महत्त्व देणे, चुकांकडे दुर्लक्ष करणे आणि एकमेकांना मदत करणे हे या पाच गुणांमध्ये समाविष्ट आहेत. या गुणांचे पालन केल्याने जोडप्यांना आयुष्यभर सुखी आणि समाधानकारक नातेसंबंध अनुभवता येतो.

नवरा-बायकोच्या नात्यात किती आणि कोणते गुण असावेत?; माहीत असायला हवं बरं
Follow us
| Updated on: Dec 05, 2024 | 8:13 PM

लग्न हे एक पवित्र बंधन आहे. नवरी आणि नवरदेव अग्नीला साक्षी ठेवून विवाहबंधनात अडकतात. सात फेरे घेऊन जन्मोजन्मीचं नातं पक्कं करतात. लग्नाच्या बंधनात फक्त दोनच व्यक्ती बांधले जात नाहीत. तर दोन्ही कुटुंबाचे नातेही अतूट होते. त्यांच्या सवयी, आनंद, दु:ख सर्व काही एक दुसऱ्याशी बांधील असतं. दोघेही नव्या जीवनाची सुरुवात करतात. लग्नानंतर संसार चांगला चालवण्याची पती आणि पत्नीची जबाबदारी असते. एकमेकांना आनंद देण्याची दोघांचीही जबाबदारी असते. लग्नानंतर एकट्याचा विचार करायचा नसतो, तर दोघांचा विचार करायचा असतो. दोघांनीही आदर्श पद्धतीने जीवन व्यतीत करायचं असतं. नवरा-बायकोच्या नात्यात किती गुण असले पाहिजे आणि कोणते गुण असले पाहिजे हेच आम्ही सांगणार आहोत.

नवरा बायकोच्या नात्यात एकूण पाच गुण असायला हवेत. तसे असंख्य गुण सांगता येतील. पण पाच गुण प्रमुख आहेत. त्याचं पालन केल्यास संसारात कधीच कुरबुर होणार नाही. तुमच्या संसाराला कधीच दृष्ट लागणार आहे. तुम्ही गोडी गुलाबीने संसार कराल. आयुष्याचं सार्थक झाल्याचं तुमच्या लक्षात येईल. कोणते आहेत हे पाच गुण?

एकमेकांचा सन्मान करा

सन्मान ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. नात्यात एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. एक दुसऱ्याचा चारचौघात मान ठेवला पाहिजे. तुमचा पार्टनर तुमच्यापेक्षा शिक्षण, गुण, पगार आणि नोकरीच्या बाबत कमी असेल. तरीही तुम्ही त्याच्याशी बरोबरीने वागलं पाहिजे. त्यांच्याशी चांगलं बोललं पाहिजे. आपण ऑफिसात नाही, तर घरात आहोत याचं भान ठेवलं पाहिजे. एकमेकांचा सन्मान ठेवला तरच पुढचं आयुष्य सोपं जातं.

पार्टनरवर प्रेम करा

नवरा-बायकोच्या नात्यातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे प्रेम. पार्टनरचा रंग आणि रुप पाहून प्रेम करू नका. एक व्यक्ती म्हणून प्रेम करा. कोणत्याही स्वार्थाशिवाय प्रेम करा. असं केल्यानेच तुमचं आदर्श नातं तयार होतं.

पार्टनरच्या इच्छांना महत्त्व द्या

नवरा-बायकोंनी एकमेकांच्या इच्छांना नेहमीच महत्त्व दिलं पाहिजे. तुम्ही एखादं काम करणार असाल तर तुमच्या पार्टनरचा सल्ला आवश्यक घ्या. नवरा बायकोच्या नात्यात पेशन्स असले पाहिजेत.

चुकांकडे दुर्लक्ष करा

कितीही मोठी चूक असू द्या त्याकडे दुर्लक्ष करा. कठिण परिस्थितीत पार्टनरला दोष देऊ नका. त्याच्यापाठी खंबीरपणे उभे राहा. तसं केलं तरच तुम्ही आदर्श पार्टनर ठराल. जर तीच चूक तुमच्याकडून झाली असती तर तुम्ही काय केलं असतं याचा एकदा विचार करून पाहा. तुम्ही पार्टनरकडून काय अपेक्षा ठेवता? पार्टनरची चूक माफ करून ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न करा.

एकमेकांना मदत करा

आदर्श पती-पत्नीच्या नात्यात आदर, आपलेपण आणि सहकार्याची भावना असली पाहिजे. पार्टनरच्या स्वभावाचा सन्मान करा. नवराबायकोने आपली इच्छा एकमेकांवर न थोपवू नका. पत्नीची दुसऱ्या महिलेशी तुलना करू नका. एकमेकांच्या मदतीला धावून जा. एक दुसऱ्याच्या कामात अडथळा देऊ नका. एकमेकांना स्वातंत्र्य द्या.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.