Study | कागदाच्या डिस्पोजेबल कपमध्ये चहा-कॉफी पिताय? आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक!
जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दिवसातून तीन वेळा चहा घेत असेल, तर यावरील प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण शरीरात शिरकाव करतात.
मुंबई : आज जवळजवळ प्रत्येक व्यक्तीला चहा पिण्याची आवड आहे. चहाप्रेमी आपल्याला जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात सापडतील. जवळजवळ 10 पावलांवर चहाची टपरी सध्या उपलब्ध आहे. अनेकदा कुठे तरी बाहेर जाता जाता तुम्ही चहा प्यायला थांबता. बर्याच वेळा चहाच्या कपचे डिझाइन पाहून एखाद्याला चहा पिण्याची तलफ येते. परंतु, या सगळ्यात जर आपण पेपर कपमध्ये चहा पीत असाल, तर आपण आत्ताच सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. असे केल्याने तुमच्या आरोग्यावर मोठे संकट ओढवू शकते. त्याचा तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यावरही खूप वाईट परिणाम होतो. जर तुम्हालाही पेपर कपमध्ये चहा पिण्यास आवडत असेल, तर आजच तुम्ही तुमची ही सवय बदलली पाहिजे (Study on Drinking hot drink in disposable cup can harm your harm).
अलिकडील एका अभ्यासामध्ये असे आढळले आहे की, जर एखादी व्यक्ती कागदाच्या कपात दिवसातून तीन वेळा चहा घेत असेल, तर यावरील प्लास्टिकचे 75,000 मायक्रोस्कोपिक कण शरीरात शिरकाव करतात. आता आपण फक्त अंदाज लावू शकता की, कागदाचा बनलेला कप एकदा वापरणे देखील किती हानिकारक आहे…
या कपात हायड्रोफोबिक फिल्म वापरली जाते
तुमच्या माहितीसाठी आम्ही सांगू इच्छितो की, आयआयटी खडगपूरने पेपर कपमध्ये चहा पिण्यावर अभ्यास केला आहे, ज्यामध्ये आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी सांगण्यात आले आहे. या संशोधनाचे नेतृत्व करणारे आयआयटी खडगपूर येथील असोसिएट प्रोफेसर सुधा गोयल यांनी असे म्हटले आहे की, डिस्पोजेबल कपमध्ये पेय पिणे सामान्य आहे, परंतु हे आपल्या आरोग्यासाठी एक घातक विष म्हणून काम करते (Study on Drinking hot drink in disposable cup can harm your harm).
काय म्हणतो अभ्यास?
नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, संशोधनाने हे निश्चित केले आहे की अशा कपांमध्ये प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होतो. हे कप तयार करण्यासाठी, हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर त्यावर बसवला गेला आहे, जो बहुधा प्लास्टिकचा बनलेला आहे. याच्या मदतीने, कपमधील द्रव आत टिकून राहतो. परंतु, गरम पाणी किंवा चहा-कॉफी यात ओतल्यानंतर 15 मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते.
सूक्ष्म कणांचा आरोग्यावर होतोय गंभीर परिणाम
या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या आयआयटी खडगपूर येथील असोसिएट प्रोफेसर सुधा गोयल यांनी नमूद केले आहे की, आमच्या अभ्यासानुसार, एका कपात 100 मिली गरम द्रव पदार्थ 15 मिनिटे ठेवल्यास 25,000 मायक्रॉन आकाराचे प्लास्टिकचे कण विरघळतात. म्हणजेच, दिवसांतून तीन वेळा कागदी कपातून चहा पिणाऱ्या एका व्यक्तीच्या शरीरात प्लास्टिकचे तब्बल 75,000 मायक्रोस्कोपिक कण शिरतात, जे थेट डोळ्यांना दिसत नाही. याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
(Study on Drinking hot drink in disposable cup can harm your harm)
हेही वाचा :
Food | रोजच्या आहारात ‘मोहरीच्या तेला’चा करा समावेश, बरेच आजार होतील दूर!#MustardOil | #food | #healthtips | #goodfood https://t.co/fSctVI9l52
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021