Marathi News Lifestyle Such fingers are more risk becoming bald research claims tlifp latest marathi viral news
खरंच की काय ! बोटांच्या रचनेवरून डोक्यावर केस टिकणार की नाही ते कळतं, जाणून घ्या लक्षणं
शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की उजव्या हाताच्या अनामिकेची अतिरिक्त लांबी पुरुषांच्या टक्कल पडण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.
Follow us
केस गळणे आणि पातळ होणे ही समस्या पुरुषांसोबतच महिलांसाठी देखील त्रासदायक आहे. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाला सुंदर आणि निरोगी केस हवे असतात. तुमचा लुक आणि पर्सनॅलिटीमध्ये तुमच्या केसांची भूमिका महत्त्वाची असते. मात्र, आजची बदलती जीवनशैली, खाण्यापिण्यातील बदल, प्रदुषण, आजारपण यामुळे पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या वाढली आहे. एवढंच नाही तर, आताच्या काळात अगदी कमी वयातच पुरूषांना केस गळतीचा त्रास होत आहे.
पुरुषांमध्ये टक्कल पडण्याची समस्या टाळण्यासाठी जगभरात अनेक संशोधन केले जात आहेत. हे का घडते, त्याचे घटक काय आहेत आणि ते कसे टाळता येईल यावर उपाय काढण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तैवानमध्ये नुकत्याच झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की ज्या पुरुषांचे अंगठ्याच्या बाजूचे बोट रिंग घालतात त्या बोटापेक्षा छोटे असते, त्यांचे टक्कल पडण्याचे चान्सेस जास्त असतात.
शास्त्रज्ञांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की उजव्या हाताच्या अनामिकेची अतिरिक्त लांबी पुरुषांच्या टक्कल पडण्याच्या पद्धतीशी संबंधित आहे.
या संशोधनासाठी, शास्त्रज्ञांनी 37 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 240 पुरुषांच्या हातांचे विश्लेषण केले ज्यांना एंड्रोजेनिक एलोपेशिया नावाची स्थिती होती, ज्यांना मेल पॅटर्न बाल्डनेस म्हटले जाते.