हाता पायावर अचानक सुज येतेय का? तुम्हालाही असु शकते ‘युरिक ॲसिड’ ची समस्या; जाणून घ्या, ‘यूरिक अॅसिड’ नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक उपाय!

युरिक ॲसिडची समस्याः आयुर्वेदमध्ये युरिक ऍसिड नियंत्रित करण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही प्रभावी आयुर्वेदिक उपायांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला यूरिक अॅसिड नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात.

हाता पायावर अचानक सुज येतेय का? तुम्हालाही असु शकते ‘युरिक ॲसिड’ ची समस्या; जाणून घ्या, ‘यूरिक अॅसिड’ नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आयुर्वेदिक उपाय!
तुम्हालाही असु शकते ‘युरिक ॲसिड’ ची समस्याImage Credit source: Image Credit Source: Freepik
Follow us
| Updated on: Jun 11, 2022 | 8:19 PM

शरीरात यूरिक ऍसिडचे प्रमाण वाढणे (Increased uric acid levels) ही एक सामान्य आरोग्य समस्या बनली आहे, परंतु त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. प्रत्येकजण, मग ती स्त्री असो कि पुरुष, यूरिक ऍसिडमुळे त्रासलेला असु शकतो. आणि बहुतेक प्रकरणांमध्ये हा आजार 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना जडतो. तज्ज्ञांच्या मते, युरिक ॲसिड हा एक प्रकारचा टाकाऊ पदार्थ आहे, जो शरीरातील महत्त्वाचा अवयव असलेल्या किडनीच्या कार्यावर (function of the kidneys) परिणाम करतो. युरिक अॅसिड वाढले की, ते शरीराच्या सांध्यांमध्ये जमा होऊ लागते आणि मग सांधे दुखीचे (Joint pain) सत्र सुरु होते. अशा स्थितीत चालण्यास त्रास होणे, सूज येणे यासारख्या समस्या उद्भवू लागतात. तर, अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या देखील वाढू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही या आजारावर उपाय शोधू शकता, परंतु आयुर्वेदात या आजारावर नियंत्रण मिळवण्याचे अनेक उपाय सांगितले आहेत.

फायबरयुक्त पदार्थ खा

शरीरातील युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढण्याचे मोठे कारण म्हणजे शरीरात प्रोटीनयुक्त आहाराचे अधिक प्रमाण. जो व्यक्ती जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खातो त्याच्या शरीरातील युरीक अ‍ॅसिडचे प्रमाण वेगाने वाढते. त्यामुळे ज्या व्यक्तींना युरीक अ‍ॅसिडची समस्या आहे त्यांनी प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समवेश कमी करून, त्याएवजी, फायबरयुक्त पदार्थांचे सेवन जास्त करावे. यात, असे पदार्थ खावेत ज्यात जास्त प्रमाणात फायबर असेल. हे फायबर तुम्हाला हंगामी फळे, पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्स यातून मिळते. ड्रायफ्रुट्स मध्ये खास करून मखाना, खजूर आणि अक्रोड खावे. यातून जास्तीत जास्त फायबर शरीराला मिळेल.

त्रिफळा

ही एक प्रकारची पावडर आहे आणि आयुर्वेदात ती सर्वोत्तम उपचार म्हणून वापरली जाते. तीन प्रकारच्या औषधी वनस्पतींचे मिश्रण करून तयार केलेले त्रिफळा चुर्ण नियमित सेवन करावे. काही दिवसात तुम्हाला फरक दिसून येईल. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, युरिक ॲसिडच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतले तर अधीक प्रभावी ठरते.

हे सुद्धा वाचा

गुळवेल रस

मराठीत गुळवेल आणि हिंदी-इंग्रजीत गिलॉय म्हणुन ओळखली जाणारी ही एक साधी वनस्पती आहे, जीचा वेल जाळ्यांप्रमाणे कोणत्याही झाडावर पसरतो. गुळवेल अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध अशी वनस्पती आहे, जिचा वापर शारीरीक प्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच इतरही अनेक फायदे देतात. युरिक अॅसिड कमी करण्यासाठी तुम्ही गुळवेल गरम पाण्यातून घेवु शकता. किंवा आयुर्वेदीक औषध दुकानात गुळवेल काढा, गुळवेल रस सहज उपलब्ध आहे. तो वापरुन बघावा

सुठं चुर्ण

सुठं अर्थात कोरडे आले पावडरचे अनेक आरोग्य फायदे आहेत जे, लोणची किंवा भाज्यांची चव वाढवतात. आयुर्वेदात त्याचे प्रचंड विशेष महत्त्व सांगितले आहेत. सुंठ चुर्ण हळदीसोबत घेतल्याने युरिक ऍसिडची समस्या कायमची दुर होऊ शकतो.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.