Health | हृदयासाठी ‘या’ दोन गोष्टी ठरतील अतिशय हानिकारक, तुम्हीही सेवन करताय तर आधी वाचाच…
शरीर निरोगी ठेवण्यात साखर किंवा मीठ महत्त्वाची भूमिका बजावते. या घटकांचे अत्यधिक आणि कमी प्रमाणातील सेवन शरीरासाठी हानिकारक ठरते.
मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यात साखर किंवा मीठ महत्त्वाची भूमिका बजावते. या घटकांचे अत्यधिक आणि कमी प्रमाणातील सेवन शरीरासाठी हानिकारक ठरते. शरीरात मीठ आणि साखर यांचे असंतुलित प्रमाण शरीरात उद्भवल्यास अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया त्या दोघांपैकी कोणत्या गोष्टीमुळे हृदयाच्या आरोग्यावर जास्त परिणाम होतो (Sugar and Salt effects on heart).
हृदयावर मिठाचा परिणाम
जेव्हा आपण रक्तदाब किंवा हृदयरोगांबद्दल विचार करतो तेव्हा त्याची सुरुवात आहारातील मीठापासून होते. या समस्या टाळण्यासाठी बरेच लोक कमी-सोडियम असलेला आहार घेतात. तथापि, खाण्यातील सोडियम कमी केल्याने हृदयाला कोणताही धोका नाही, हा समाज पूर्णपणे चुकीचा आहे.
सोडियमचे सेवन कमी केल्याने देखील काही लोकांना रक्तदाबाची समस्या होऊ शकते. परंतु, काही लोकांमध्ये सोडियमच्या कमतरतेमुळे रक्तदाब वाढल्याचे आढळले आहे. कमी सोडियममुळे हृदय गती आणि हृदयावरील दाब देखील वाढतो. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या व्यक्तीने एका दिवसात 1.5 ग्रॅमपेक्षा कमी मीठ खाऊ नये अन्यथा हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते. त्याच वेळी, 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि मधुमेहाच्या रुग्णांनी दररोज 1.5 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.
सोडियम हे एक आवश्यक पोषक तत्व आहे आणि बर्याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की, बहुतेक लोकांनी हृदय निरोगी आणि शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज 3-6 ग्रॅम दरम्यान सेवन केले पाहिजे. बहुतेक लोक या प्रमाणातच सोडियम घेतात (Sugar and Salt effects on heart).
साखरेचा हृदयावर परिणाम
पॅक फूडमध्ये 75 टक्के कृत्रिम साखर असते. साखर जास्त प्रमाणात सेवन केल्यास हार्मोन्स खराब होतात. ज्यामुळे केवळ मधुमेहच नव्हे तर उच्च रक्तदाब देखील वाढण्याची शक्यता असते. जे लोक साखरेच्या माध्यमातून दररोज 25 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त कॅलरी सेवन करतात अशा लोकांमध्ये दररोज 10 टक्क्यांपेक्षा कमी कॅलरी खाणाऱ्यांपेक्षा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याची शक्यता 3 पट जास्त असते.
साखरेचे जास्त सेवन केल्याने लठ्ठपणा, दंत समस्या, रक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास होतो. तथापि, अमेरिकन मार्गदर्शक समितीने साखरपेक्षा मीठ अधिक हानिकारक हानिकारक म्हटले आहे आणि त्यांनी अन्न उद्योगास सोडियमची पातळी कमी ठेवण्यास सांगितले आहे. कमी सोडियमयुक्त अन्नाचा आपल्या शरीरावर तितकाच प्रभाव पडतो, जितका अधिक साखर खाण्यामुळे होतो. उच्च प्रमाणात साखर खाण्यामुळे उच्च रक्तदाब, हृदयरोग आणि लवकर मृत्यूचा होण्याचा धोका वाढतो.
शरीराला सोडियम आणि साखर संतुलित प्रमाणात मिळण्यासाठी, प्रक्रिया केलेले खाद्य खाणे पूर्णपणे टाळा. त्याऐवजी मीठ आणि गोड कमी असलेले नैसर्गिक पदार्थ खा. वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांमध्ये, पोटॅशियममुळे सोडियम संतुलित असते. तर पाणी, फायबर आणि इतर घटकांमुळे योग्य प्रमाणात नैसर्गिक साखर देखील उपलब्ध असते. रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी, आहारात ताजी फळे आणि भाज्या खा.
(टीप : वरील माहिती ही संशोधनावर अआध्रीत असून, कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
(Sugar and Salt effects on heart)
हेही वाचा :
दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…#GreenTea | #Health | #food | #drink https://t.co/VMbYebOZ9t
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021