शरीरातील फॅट लवकर बर्न करायचे असतील तर रिकाम्या पोटी खा ‘ही’ फळं
लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक जिममध्ये जातात आणि तासनतास घाम गाळतात. पण तुमच्या आहारात फळांचे समावेश करून त्यांचे सेवन केल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील फॅट नैसर्गिकरित्या कमी करू शकता.

चुकीच्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणाचा धोका सतत वाढत आहे. जंक फूड आणि अति खाणे यासारख्या सवयींमुळे शरीरात फॅट वाढण्यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामळे अशा परिस्थितीत, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलणे महत्वाचे आहे. कारण या लठ्ठपणामुळे तुम्हाला मधुमेह, बीपी, हृदयरोग आणि थायरॉईड सारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तुमच्या शरीरावर यांचा वाईट परिणाम होत असतो. अशा वेळेस आहारतज्ज्ञ मोहिनी डोंगरे सांगतात की जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर दररोज रिकाम्या पोटी काही विशिष्ट फळे खाण्यास सुरुवात करा. तुमचे चयापचय निरोगी ठेवण्यासोबतच, ते फॅट लवकर बर्न करण्यास देखील मदत करते. ही फळे फायबरने समृद्ध असल्याने, हे तुमचे पोट देखील निरोगी ठेवतील. चला तर मग जाणून घेऊयात की दररोज रिकाम्या पोटी कोणत्या फळांचे सेवन करावे…
पपई
पपईमध्ये पपेन नावाचे एंजाइम असते, जे पचन सुधारते. हे शरीरातील अतिरिक्त फॅट काढून टाकते. हे फळ नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. पपईमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने अशा परिस्थितीत तुम्ही वजन कमी करण्यासाठी हा एक परिपूर्ण पर्याय चांगला आहे. रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने फॅट लवकर बर्न होते.
केळी
केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि नैसर्गिक साखर असते. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरातील चयापचय वाढतो, ज्यामुळे फॅट बर्न होण्यास मदत होते. हे खाल्ल्यानंतर तुमच्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळेल. केळी मध्ये पेक्टिन नावाचा घटक आढळतो, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
द्राक्ष
द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. याशिवाय द्राक्षांमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असते. रिकाम्या पोटी ते खाल्ल्याने शरीरातील चयापचय सुधारतो आणि फॅट ही लवकर बर्न होते.
किवी
किवीमध्ये फक्त एकच नाही तर अनेक जीवनसत्त्वे आढळतात. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांच्यासाठी किवी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. त्यात फायबरचे प्रमाणही चांगले असल्याने ते पोटासाठीही फायदेशीर आहे. जर तुम्हाला फॅट लवकर बर्न करायचे असेल तर दररोज रिकाम्या पोटी दोन किवी खा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)