सूर्य प्रकाशात ठेवलेलं पाणी ‘सन चार्ज वॉटर’ प्यायल्याने शरिरात चमत्कारिक बदल होतात?

आज काल 'सन चार्ज वॉटर' म्हणजे सूर्य प्रकाशात ठेवलेलं पाणी पिण्याचा ट्रेंड आला आहे. 'सन चार्ज वॉटर' प्यायल्याने शरिरात चमत्कारिक बदल होतात असा दावा करण्यात येत आहे. पण खरंच 'सन चार्ज वॉटर' प्यायल्याने शरिरात चमत्कारिक बदल होतात का? नक्की 'सन वॉटर' ट्रेंडची सत्यता काय आहे हे जाणून घेऊयात.

सूर्य प्रकाशात ठेवलेलं पाणी 'सन चार्ज वॉटर' प्यायल्याने शरिरात चमत्कारिक बदल होतात?
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 3:48 PM

आजकाल बरेच ट्रेंड निघतात. मग ते आरोग्याबाबत असो, डाएटबाबत असो किंवा फॅशनबाबत असो. एखादा ट्रेंड व्हायरल झाला की मग त्याला सर्रासपणे फॉलो केलं जातं. त्यात चूक काय बरोबर काय याची काहीजण साधी पडताळणी देखील करून पाहत नाही. असाच एक ट्रेंड निघालाय जो इतका व्हायरल झाला की बहुतेक जणांनी तो फॉलो करण्यास सुरुवातही केली आहे. ते म्हणजे ‘सन चार्ज वॉटर’. सूर्यप्रकाशात ठेवलेलं पाणी.

शरिरात व्हिटामिन्स आणि मिनरल्सची कमतरता झाली की समजायचं शरिरात व्हिटामिन बी 12 आणि व्हिटामिन-डी ची कमी आहे. जर कोणत्याही एका व्हिटामिनची कमी असेल तर आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. मग त्यांना कोवळे ऊन घेण्यास सांगितले जाते किंवा मग सप्लीमेंट घेण्याचा सल्ला देतात.

पण आता ज्यांना रोजच्या धावपळीत किंवा नोकरीमुळे ज्यांना सकाळचे कोवळे ऊन घेणं शक्य होत नाही किंवा तेवढं लक्षात राहत नाही. त्यामुळे शरिराला व्हिटामिन ‘डी’ मिळण्यासाठी ‘सन चार्ज वॉटर’चा ट्रेंड निघाला. पण हे ‘सन चार्ज वॉटर’ काय असतं आणि त्यामुळे खरच शरिरातील व्हिटामिन डी वाढतं का? याविषयी डायटिशिन राधिका गोयल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

‘सन चार्ज वॉटर’ ने शरिराला इतर फायदे खरंच होतात का?

सूर्य प्रकाशात ठेवलेल्या पाण्याला ‘सन चार्ज वॉटर’ म्हणतात. आजकाल त्याचं ट्रेंड सुरु झालं आहे. अनेकांचं म्हणणं आहे की या पाण्याचं सेवन केल्यानं शरीरातील व्हिटामिन-डी ची लेव्हल वाढू शकते. पण हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं राधिका यांनी सांगितलं. सूर्यप्रकाशात पाणी ठेवल्यानं त्यात येणाऱ्या सूर्यप्रकाशानं कोणतीही एनर्जी किंवा गुण मिळत नाही.

जेव्हा आपली त्वचा ही सूर्य प्रकाशाच्या संपर्कात येतात, तेव्हा नक्कीच शरीरात व्हिटामिन-डी मोठ्या प्रमाणात मिळतं. त्यामुळे व्हिटामिन-डी ची कमी असेल तर सूर्यप्रकाशात राहण्याचा सल्ला देतात. पण सूर्यप्रकाशात पाणी ठेवून ते पाणी प्यायल्यानं व्हिटामिन-डी मिळत नाही. असं डायटिशिन राधिका गोयल यांनी म्हटलं आहे.

‘सन चार्ज वॉटर’ अनेक आजारांवर रामबाण उपाय 

तर दुसरीकडे आरोग्य केंद्राचे आयुर्वेदाचार्य डॉ. एस एन तिवारी यांच्या मते, ‘सन चार्ज वॉटर’ थेरपीचे खूप फायदे असतात. सूर्यप्रकाशात सात प्रकारचे रंग असतात आणि प्रत्येक रंग शरीरासाठी खूप प्रभावी असतो. या रंगांचे आयुर्वेदात आरोग्य लाभ देण्यासाठी ‘सन चार्ज वॉटर’ महत्त्वाचे ठरते. याचा उपयोग शरीरातील सर्व प्रकारचे रोग दूर करण्यासाठी होतो.

सूर्यप्रकाशित पाणी वापरल्याने अनेक गंभीर समस्यांपासून आराम मिळतो. सूर्यप्रकाशित पाणी पिण्यासाठी, डोळे धुण्यासाठी, जखमा धुण्यासाठी किंवा मालिश करण्यासाठी वापरले जाते.

आयुर्वेदाचार्य डॉ. एस एन तिवारी यांच्या मते ‘सन चार्ज वॉटर’ चे फायदे कोणते?

आयुर्वेदानुसार सूर्यकिरणांमधून निघणारे रंग खराब पाणी शुद्ध करण्याचे काम करतात. सूर्यप्रकाशाच्या अतिनील किरणांमुळे पाण्याचा सूक्ष्मजीव भार कमी होतो. बाटलीत पाणी ठेवून ते सूर्यप्रकाशात टाकल्याने त्याचे गुणधर्म पाण्यात शोषले जातात. याचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि सूज येण्याची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.

सोलराइज्ड पाण्यात अनेक गुणधर्म आढळतात जे त्वचेसाठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म त्वचा आणि डोळ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत. या पाण्याने डोळे आणि त्वचा धुणे फायदेशीर आहे.

सूर्यप्रकाशित पाण्याचा वापर केल्यास पचनक्रिया मजबूत होण्यास मदत होते. याच्या सेवनाने पचनाची आग खूप जलद वाढते आणि ॲसिडिटी, पोटात अल्सर आणि पोटातील जंत यासारख्या पोटाच्या अनेक समस्यांमध्ये आराम मिळतो.

तसेच सूर्यप्रकाशमुळे मिळमारे ‘व्हिटामिन-डी’ महत्त्वाचे का असते?

व्हिटामिन-डी का महत्त्वाचे आहे? व्हिटामिन-डी आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. व्हिटामिन-डी असेल तर दात आणि हाडं मजबूत होतात. व्हिटामिन-डी रोग प्रतिकार शक्ती वाढते. शरिरातील व्हिटामिन-डी ची कमतरता वाटत असेल तर टी-सेल्सचं प्रोडक्शन कमी होतं. महत्त्वाचं म्हणजे या टी-सेल्समुळे अनेक आजार होण्यापासून आपण वाचतो. व्हिटामिन-डी स्ट्रेसला कमी करण्यास मदत करते. व्हिटामिन-डी मसल्सची वाढ होण्यास देखील मदत करते. व्हिटामिन-डी योग्य प्रमाणात असेल तर पचनक्रिया होण्यास मदत होते. व्हिटामिन-डीमुळे टाईप 2 डायबिटीज देखील होत नाही. त्याशिवाय मेंदूची शक्ती वाढते आणि त्यामुळे तुमची बुद्धी ही तल्लीन होते.

व्हिटामिन-डीचे स्त्रोत काय आहेत? मशरुम संत्री केळ पालक दही टोफू चीज पदार्थांमधून व्हिटामिन-डी मिळतं. खाद्यपदार्थातून व्हिटामिन-डी मिळवणे योग्यच आहे. पण सोबतच वेळात वेळ काढून अगदी 5 ते 7 मिनीटांसाठी का होईना पण सकाळचे कोवळे ऊन घेणे शरिराला अनेकबाबतीत फायदेशीर ठरेल असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.

(डिस्क्लेमर : बातमीत दिलेल्या माहितीला आम्ही दुजोरा देत नाही. कोणताही उपचार करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्ला घेऊनच उपचार करावेत.)

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....