लठ्ठपणा कमी करायचाय? मग, थंड पाण्याने आंघोळ करा होतील अनेक फायदे!

| Updated on: Mar 23, 2021 | 2:30 PM

आंघोळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे.

लठ्ठपणा कमी करायचाय? मग, थंड पाण्याने आंघोळ करा होतील अनेक फायदे!
आंघोळ
Follow us on

मुंबई : आंघोळ आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाची आहे. दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे, यामुळे आपली त्वचा आणि केस स्वच्छ होतात. तसेच, आंघोळ केल्याने ताजेपणा वाटतो. याशिवाय आंघोळ करुन आपला दिवसभराचा कंटाळा दूर होतो. काही लोकांना कडक पाण्याने आंघोळ करायला आवडते तर काहींना थंड पाण्याने आंघोळ करायला आवडते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे की, थंड पाण्याने आंघोळ केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. (Take a bath with cold water to reduce obesity)

-थंड पाण्याने आंघोळ केल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण वाढलं. यामुळे आपली चरबी वितळण्यास मदत होते. यासोबत थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत देखील होते.

-हिवाळ्यात, बहुतेक लोक आंघोळीसाठी जास्त गरम कडक पाणी घेतात. यामुळे तुमची त्वचा कोरडी होते आणि केसांची ओलावाही कमी होतो. म्हणून शकतो आंघोळ करताना कोमट पाणी घ्यावे जास्त गरम पाणी घेऊन नये.

-आंघोळीच्या दहा मिनिटे अगोदर पूर्ण शरीरावर नारळाचे किंवा बदामाचे तेल लावून मालिश करा. यामुळे त्वचा कोमल आणि सतेज बनेल.

-आंघोळीच्या पाण्यात कापूर घाला आणि या पाण्याने स्नान करा. याचा तुमच्या शरीराला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. यासाठी कापूरचे 2 ते 3 तुकडे आंघोळीच्या पाण्यात मिसळा. यामुळे शरीर आणि डोकेदुखी देखील कमी होते.

-पाण्यात कडूलिंबाची पाने मिसळून आंघोळ केली, तर तुम्हाला तजेला येईल. हे पाणी थकवा दूर करण्याबरोबरच आपल्या त्वचेसंदर्भातील समस्या दूर करण्यात देखील हे प्रभावी आहे.

-आंघोळीच्या पाण्यात बेकिंग सोडाचा वापर केल्याने शरीरातील टॉक्सिक घटक दूर होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात चार चमचे बेकिंग सोडा टाकून स्नान करावे. यामुळे आपला थकवा देखील दूर होईल

-थंड पाण्याने आंघोळ केल्याने काही वेळेसाठी तणावही कमी होण्यास मदत होते.

टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Oily Skin | उन्हाळ्यात चेहरा तेलकट होतोय? ‘या’ गोष्टींचा वापर केल्यास सर्व समस्या होतील दूर!

Beauty Tips | नखांचा पिवळेपणा दूर करायचाय? मग, ‘या’ टिप्स नक्की ट्राय करा!

(Take a bath with cold water to reduce obesity)