रोड ट्रिपला जाताना तुमच्या सोबत ठेवा हे स्नॅक्स; संपूर्ण ट्रिपमध्ये राहाल ताजेतवाने
प्रवासाचा विचार केला तर असे अनेक लोकं आहेत ज्यांना रोड ट्रिप करायला खूप आवडते. अशावेळी अनेकजण त्यांचे वाहन घेऊन फिरायला जातात. तेव्हा तुम्ही ट्रीपला जाताना काही स्नॅक्स सोबत जरूर ठेवा. जे हलके असतात तसेच शरीराला ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवतात.
![रोड ट्रिपला जाताना तुमच्या सोबत ठेवा हे स्नॅक्स; संपूर्ण ट्रिपमध्ये राहाल ताजेतवाने रोड ट्रिपला जाताना तुमच्या सोबत ठेवा हे स्नॅक्स; संपूर्ण ट्रिपमध्ये राहाल ताजेतवाने](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Road-trip-snacks.jpg?w=1280)
आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना रोड ट्रिप करायला फार आवडते. तेव्हा अनेकजण त्यांच्या कोणत्याही वाहनाने रोड ट्रिपला करायला निघुन जातात. अशातच लाँग ड्राइव्ह मजेदार आहे, पण या ट्रिपच्या दरम्यान जर तुम्ही बराच वेळ रिकाम्या पोटी राहिलात तर थकवा आणि आळसपणा आल्याने तुमचा प्रवास कंटाळवाणा होऊ शकतो, कारण अनेकदा बाहेर गेल्यावर खाण्यासाठी योग्य पर्याय उपलब्ध होत नाहीत. जर तुम्हीही मित्रांसोबत किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीसोबत लाँग रोड ट्रिप प्लॅन करत असाल तर यावेळी सोबत काय खायला ठेवावे ते जाणून घेऊयात. अशातच असे काही स्नॅक्स आहेत जे पौष्टिकदृष्ट्या समृद्ध आहेत आणि शरीरातील उर्जा वाढविण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहेत.
रोड ट्रिप आनंददायी आणि मजेदार करायची असेल तर प्रवास चांगला होणे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या आरोग्यासाठीही योग्य अशा खाद्यपदार्थांची निवड करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रथिने, फायबर, हेल्दी फॅटचा उत्कृष्ट स्रोत असलेल्या काही स्नॅकच्या पर्यायांबद्दल जाणून घेऊया. यामुळे तुमचे पोटही भरलेले राहील आणि हे स्नॅक्स देखील खराब होणार नाही.
बियाणे आणि नट्स यांचे मिश्रण
लांबच्या प्रवासासाठी तुम्ही स्नॅक म्हणून बियाणे आणि नटस यांचे मिश्रण तुमच्यासोबत ठेवू शकता. यात तुम्ही बदाम, पिस्ता, काजू, मखाना, शेंगदाणे, भोपळ्याच्या बिया, खरबूज आणि टरबूज यांच्या बिया इत्यादी मिक्स करून घ्या. त्यानंतर हे संपूर्ण मिश्रण अर्धा किंवा एक चमचा देशी तूपात भाजून घ्या. त्यात थोडे मीठ घालावे. हे कुरकुरीत मिश्रण एअरटाइट डब्यामध्ये बराच काळ साठवून ठेवता येते.तसेच प्रवासात त्याचे सेवन देखील अगदी आरामात करू शकतात.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Saif-Ali-Khan-7-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Navri-Mile-Hitlerla-2-2.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Vicky-Kaushal-and-Devendra-Fadnavis.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Khushi-Kapoor.jpg)
ग्रॅनोला किंवा एनर्जी बार घेऊन जा
प्रवासा दरम्यान अनेकांना प्रचंड भुक लागते आणि आसपास फारसे काही नसताना तुम्ही या भुकेसाठी तुमच्या सोबत ग्रॅनोला किंवा एनर्जी बार ठेवू शकता. ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला संपूर्ण प्रवासात ऊर्जावान राहण्यास मदत करते. तसेच या गोष्टी बनवण्यासाठी कोणताही त्रास नसतो. फक्त हे लक्षात ठेवा की त्यातील सर्व घटक हेल्दी आहेत, म्हणून त्यासोबत जास्त साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह घटक यात मिळू नका.
प्रवासात फळं हे उत्तम स्नॅक्स
प्रवासात फळं ही अशी गोष्ट आहे जी आरामात कोठेही पॅक आणि सोबत घेऊन जाऊ शकतात. सफरचंद, संत्री, किवी अशी अनेक तुमच्या आवडीचे फळं सोबत पॅक करा. खराब होण्याची कोणतीच भीती नसते आणि फळांच्या सेवनाने तुमच्या शरीराला भरपूर ऊर्जा देण्याचे काम ते करतात.
मिलेट्स क्रैकर्स हा देखील एक चांगला पर्याय
रोड ट्रिपला जाताना कधी कधी लांबच्या प्रवासात मिलेट्स क्रैकर्स म्हणजे पौष्टिक कुकीज सोबत ठेवू शकता. तुम्ही ते घरी देखील बनवू शकता किंवा बाजारातून घेऊ शकता. जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर तुम्ही घरीच मिलेट्स क्रैकर्स (कुरकुरीत पौष्टिक कुकीज) बनवणे योग्य ठरेल. या पौष्टिक कुकीज खूप निरोगी आहेत, कारण त्या पौष्टिक धान्यांपासून बनविल्या जातात आणि बेक केल्या जातात.