Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

भेसळ करताना दुधात फक्त पाणीच घातले जात नाही तर, त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात अनेक रसायने देखील घातली जातात.

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Follow us
| Updated on: Dec 18, 2020 | 3:49 PM

मुंबई : दुधाला संपूर्ण आहार म्हटले जाते. परंतु, जेव्हा दुधात काही घटक मिसळून शुद्धता त्याची शुद्धता कमी केली जाते, तेव्हा हे पूर्णान्न शरीरासाठी अतिशय धोकादायक होते. बर्‍याच वेळा असे घडते की, भेसळ करताना दुधात फक्त पाणीच घातले जात नाही तर, त्याचे प्रमाण वाढवण्यासाठी त्यात अनेक रसायने देखील घातली जातात. या रसायनांनामुळे शरीराला हानी होती आणि हे भेसळयुक्त दूध तुम्हाला आजारी बनवू शकते. इतकेच नाही तर हे दूध वाढत्या वयाच्या मुलांच्या वाढीस प्रतिबंधित देखील करू शकते. आपल्या घरी येणारे दूध हे शुद्ध आहे की भेसळ युक्त हे तपासण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स…(Techniques for adulterated milk testing)

पाणीमिश्रीत दूध

दुधात पाणी मिसळले आहे का, हे तपासण्यासाठी एका उतार पृष्ठभागावर दुधाचा थेंब टाका. शुद्ध दुधाचा एक थेंब हळूहळू पांढरा रेष सोडत पुढे जाईल. तर, पाणीमिश्रीत दूध काहीही निशाण न सोडता वाहून जाईल.

स्टार्च

लोडिन या रसायनाच्या सोल्युशनमध्ये दुधाचा एक थेंब टाका. जर हे मिश्रण निळे झाले तर, दुधात स्टार्च मिसळले आहे.

युरिया

एका टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा दूध घ्या. यात अर्धा चमचा तुरीच्या डाळीची किंवा सोयाबीनची पावडर घाला. या मिश्रणाला व्यवस्थित ढवळा. पाच मिनिटांनी यात एक लाल लिटमस पेपरचा तुकडा टाका. हा कागदाचा तुकडा निळा झाला तर समजा त्या दुधात युरिया मिसळलेला आहे.

डिटर्जेंट

5 ते 10 एमएल दुधात तितकेच पाणी मिसळा आणि व्यवस्थित ढवळा. या मिश्रणात फेस आल्यास दुधात साबणाची पावडर अर्थात डिटर्जेंट मिसळण्यात आला आहे.(Techniques for adulterated milk testing)

सिंथेटिक दूध

सिंथेटिक दुधाला कडवट चव असते. तसेच, त्याचा थेंब बोटांवर घेऊन चोळल्यास साबणासारखे वाटते आणि गरम केल्यानंतर हे दूध पिवळसर पडते. दुकानात सापडलेल्या युरीअस पट्टीच्या सहाय्याने या दुधात कृत्रिम प्रथिनेयुक्त पदार्थ आहे का, ते तपासले जाऊ शकते. या पट्टीसोबत मिळणारी रंगाची सूची दुधात भेसळ आहे की नाही ते सांगेल.

भेसळयुक्त दुधाचे दुष्परिणाम

भेसळयुक्त दूध मानवी आरोग्यास अपायकारक असते, त्यापासून असाध्य आजार उद्‌भवण्याची शक्‍यता असते जसे की – आय.सी.एम.आर.च्या अहवालानुसार भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. युरियाची भेसळ केल्याने त्यातील नायट्रोजन या घटकामुळे मूत्रपिंड, हृदय व यकृत यांसारखे अवयव निकामी होण्याची भीती असते. तसेच कॉस्टिक सोड्याच्या भेसळीमुळे दुधातील शरीरवाढीसाठी आवश्‍यक असणारे लायसिन हे अमिनो आम्ल शरीरास उपलब्ध होत नाही. परिणामी लहान मुलांच्या शरीरवाढीवर परिणाम होऊन शरीराची वाढ खुंटते. यामधील सोडिअमसारख्या घटकाचा मानवी शरीरावर परिणाम होऊन उच्च रक्तदाब व हृदय विकारासारखे आजार जडतात.

(Techniques for adulterated milk testing)

हेही वाचा :

मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.