नववधू एकटीच हनिमूनला गेली… यामागचे कारण खूपच वेदनादायी

आजकल प्रेमाच्या आणाभाका तर अनेक जण घेतात, परंतू प्रत्यक्षात प्रेमाच्या कसोटीवर त्यातील खूपच कमी लोक खरे उतरत असतात. आज आपण अशा तरुणीची कहाणी वाचणार आहोत जिने आपल्या प्रेमाला गमावल्यानंतरही त्याला आपल्या हृदयात जपून ठेवले.

नववधू एकटीच हनिमूनला गेली... यामागचे कारण खूपच वेदनादायी
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 7:56 PM

कंगना रणौत हीचा ‘क्वीन’ चित्रपट अनेकांनी पाहीला असले. त्यात अभिनेत्री कंगना हीला तिचा वागदत्त वर (अभिनेता राजकुमार राव ) लग्नाच्या काही तास आधी लग्नाला नकार देतो. लंडनहून आलेल्या राजकुमार राव याला कंगणा हीच्या आपले जमणार नाही असे वाटते, त्याला राणी गावढंळ वाटते. परंतू त्यानंतर दु:ख करण्याऐवजी कंगणा एकटीच हनिमूनला निघते. याच कहानीशी मिळती जुळती कहाणी प्रत्यक्षात घडलेली आहे.पण ती जरा दर्दभरी आहे…

टीकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडीओतून ही कहाणी उघड झाली आहे. मर्फी नावाच्या महिलेचा विवाह ठरला होता. परंतू लग्नाच्या एक महिना आधीच तिच्या वागदत्त वराचा मृत्यू झाला. ही दु:खद घटना घडल्यानंतर कोणी सर्वसाधारण मुलगी निराशेत गेली असती. परंतू मर्फीने आपले ठरलेली लंडनची ट्रीप रद्द केली नाही. कारण तिच्या होणाऱ्या नवऱ्याने आणि तिने हे ठिकाण निवडले होते. त्यामुळे आपल्या बॉयफ्रेंडच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तिने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला. या आपल्या हनिमून ट्रीपचा व्हिडीओ तिने शेअर करताना म्हटले आहे की माझ्या प्रवासाला मी रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला आहे कारण दु:ख आपल्याला एकटं करुन टाकतं. या मार्गामुळे मी कदाचित अशा व्यक्तीशी जोडली जाऊ शकेल जो अशाच दु:खातून गेला आहे असेही तिने म्हटले आहे.

लंडनमध्ये आपल्या पहिल्याच दिवशी मर्फीने आपल्या हॉटेलच्या रुमचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन शेअर केला आहे. हे माझ्यासाठी खूपच वेदनादायी आहे की माझा भावी जोडीदार माझ्या सोबत नाहीए..त्यानंतर काही दिवसाने तिने लंडनच्या हाईड पार्कमध्ये बसलेला तिचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. त्यात तिने लोकांचे आपल्या सिंगल ट्रीपला पाठींबा दिल्याबद्दल आभार मानले आहेत.

तिने म्हटले की मी एक असा व्हिडीओ बनवू इच्छित आहे ज्यात मला सांगायचे आहे की सर्वांच्या संदेशांसाठी किती आभारी आहे. माझी इच्छा आहे की प्रत्येकाला उत्तर देऊ शकू, आणि सर्वांसोबत वेळ व्यतित करु शकेन.

व्हिडीओ करण्याचा निर्णय

मर्फीने टीकटॉकवर व्हिडीओ तयार करण्याचा निर्णय का घेतला याची कारणमीमांसा सांगितली आहे. मर्फी म्हणते की दु:ख ही वेगळीच प्रक्रीया आहे. आज मी जे अनुभवत आहे. ते उद्याच्या भावनेपेक्षा वेगळे असू शकते. माझा होणारा नवरा खूपच निस्वार्थी होता. खास करुन माझ्या बाबतीत. मला नेहमी वाटायचं की तो मला खूश करण्यासाी जे काही करू शकतो ते त्याने करावे, आणि मी त्या रोमान्सचा आनंद घ्यावा आणि जीवन जगण्याचा प्रयत्न करावा.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.