बहुगुणी आवळा, केस फक्त वाढतच नाही तर…

हिवाळ्यात केस गळणे आणि कोरडेपणा येणे सामान्य आहे. अशावेळी बाहेरमहागड्या उत्पादनांचा वापर करण्यापेक्षा घरगुती उपाय करणे चांगले, त्यासाठी आवळा हा चांगला पर्याय आहे. आवळ्याचा वापर करून तुम्ही केसांच्या अनेक समस्या दूर करू शकता.

बहुगुणी आवळा, केस फक्त वाढतच नाही तर...
आवळ्याचे केसांसाठी फायदे काय ?
Follow us
| Updated on: Dec 06, 2024 | 4:15 PM

हिवाळा हा ऋतू सगळ्यांना खूप आवडतो. पण या ऋतूत हवामान थंड असल्याने आपल्याला त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. थंडीच्या दिवसात त्वचेचा ओलावा कमी होतो त्यामुळे त्वचा कोरडी होते. त्याचप्रमाणे केसांच्या बाबतीतही असेच घडते. हिवाळ्यात केस गळणे, कोंडा होणे तितकेच सामान्य आहे. त्यात आपल्यापैकी असे अनेकजण आहेत ज्यांना या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे त्वचेबरोबरच केसांचीही खूप काळजी घेणं गरजेचं आहे.

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढते. कारण या दिवसात केसांमधील तेलकटपणा कमी झाल्याने कोंडा जास्त प्रमाणात होत असतो. त्यामुळे अनेकजण या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी विविध उत्पादनांचा वापर करतात. त्याचबरोबर काही लोक घरगुती उपायही करतात. केस निरोगी राहण्यासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. याचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. आज या लेखात आम्ही तुम्हाला आवळ्याचा वापर कसा करावा हे सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे केस निरोगी बनवू शकता.

आवळ्याच्या तेलाने मसाज करा

केसांच्या वाढीसाठी आवळा खूप प्रभावी आहे. अशावेळी जेव्हा जेव्हा तुमच्या केसांमध्ये काही समस्या निर्माण झाली असेल तेव्हा तुम्ही त्याचा वापर करू शकता. रात्री आवळ्याचे तेल गरम करून केसांना मसाज करा. असे केल्याने रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे मुळांना फायदा होतो. रात्री झोपण्यापूर्वी मालिश करणे आणि सकाळी उठल्यावर केस स्वच्छ धुवा.

आवळा पावडर केसांना लावा

केसांच्या समस्यांनी त्रस्त झाले असाल तर यासाठी तुम्ही एका वाटीत आवळा पावडर घेऊन त्यात दोन ते तीन चमचे दही घालून याची पेस्ट तयार करा. त्यानंतर तयार झालेली पेस्ट संपूर्ण केसांना नीट लावा व ३० मिनिट तसेच राहू द्या. ३० मिनिट झाल्यानंतर केसांना शॅम्पू लावून स्वच्छ धुवा. या हेअर मास्कचा वापर केल्यास तुमच्या केसांमधील कोंड्याची तक्रार दूर होईल.

आवळ्याच्या रसाने केस धुवा

थंडीच्या दिवसात आपल्या टाळूची पीएच पातळी नीट राहण्यासाठी आठवड्यातून दोनदा ताज्या आवळ्याचा रस पाण्यात मिसळून केसांना शॅम्पू केल्यानंतर लावून घ्या. त्यानंतर केस पुन्हा स्वच्छ धुवा. अशाने तुमच्या केसांना नैसर्गिक चमक मिळेल.

खोबरेल तेलात आवळा मिसळून लावा

नारळाच्या तेलात आवळा मिसळून लावल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होतात. यासाठी तुम्हाला खोबरेल तेलामध्ये आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून उकळून घ्यावेत. यानंतर हे तेल गाळून घ्या आणि थंड झाल्यावर टाळूवर लावा. याचा वापर केल्याने केसगळती कमी होईल आणि केस दाट होण्यासही मदत होईल.

मेंदीसोबत आवळा लावा

जर तुम्ही केसांना मेंदी लावत असाल तर मेहंदीत आवळा पावडर मिसळा. हा पॅक केसांना व्यवस्थित लावा आणि 1 तासानंतर केस धुवा. असे केल्याने केस मजबूत होतील आणि केसांना कंडिशनरची गरज भासणार नाही. हा मास्क तुम्ही 2 आठवड्यातून एकदा वापरू शकता.

आवळ्याचा आहारात समावेश करा

केसांमधील समस्या दूर करण्यासाठी तुम्ही आवळ्याचे तेल आणि आवळ्याचा हेअर मास्क लावल्याने केसांना मजबुती मिळते. पण केसांना आतून पोषण मिळण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करा. कारण केसांच्या चांगल्या परिणामासाठी ते खाणेही गरजेचे आहे. यासाठी तुम्ही आवळा रसही पिऊ शकता. यामुळे केस आणि शरीर दोघांनाही फायदा होईल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.