या 3 चुकांमुळे पती-पत्नीचं नातं होतं कमजोर, तुम्हीही या चुका करत नाही ना ?

लग्न झालं की पती-पत्नीमध्ये कुरबुरी होत असतात. कधी भांडण होतं तर कधी मिटतंही. असं म्हटलं जातं की शारीरिक संबंध किंवा पैशांची कमतरता यामुळे वैवाहिक जीवनात मोठी समस्या निर्माण होते. पण फक्त हेच कारण नातं बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतं असं नाही.

या 3 चुकांमुळे पती-पत्नीचं नातं होतं कमजोर, तुम्हीही या चुका करत नाही ना ?
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 3:38 PM

लग्न झालं की पती-पत्नीमध्ये कुरबुरी होत असतात. कधी भांडण होतं तर कधी मिटतंही. असं म्हटलं जातं की शारीरिक संबंध किंवा पैशांची कमतरता यामुळे वैवाहिक जीवनात मोठी समस्या निर्माण होते. पण फक्त हेच कारण नातं बिघडण्यासाठी कारणीभूत ठरतं असं नाही. बरेच वेळा अनहेल्दी कम्युनिकेशन, ॲटीट्युड आणि अविश्वास यामुळेही नात्याला तडा जाऊ शकतो. निरोगी, आनंदी रोमँटिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी, सामान्य समस्या ओळखणे आणि मुळासकट त्यांचा नाश करणं महत्वाचं आहे. अन्यथा प्रकरण घटस्फोटापर्यंत जाऊ शकतं.

पण, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा कधीकधी एखाद्या व्यक्तीला हे समजण्यात अडचण येते की त्याच्या स्वतःच्या सवयी नात्यात कटुता निर्माण करू शकतात. अशा काही सवयींबद्दल जाणून घेऊया ज्या नात्यात दुरावण्याचे कारण बनू शकतात आणि जर या सवयी तुमच्या किंवा तुमच्या पार्टनरमध्ये असतील तर या सवयी काढून टाकणे शहाणपणाचे ठरेल

संवादाचा अनुभव

जर तुमच्या आणि तुमच्या पार्टनरमध्ये कम्युनिकेशन गॅप असेल किंवा तुम्ही एकमेकांशी नीट बोलत नसाल तर तुमचे नाते बिघडू शकते. जर एखाद्या विवाहित जोडप्यातील एखाद्या व्यक्तीला अपमानित किंवा वेगळे वाटत असेल तर ते नाते दीर्घकाळ टिकणे अशक्य आहे.

बाहेरच्या लोकांची दखल

आपल्या समाजात अनेकदा लोक प्रत्येक नात्यात ढवळाढवळ करतात, पण काहीवेळा बाहेरच्या नात्याचा तुमच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होतो. पालक, मित्र किंवा एखादे मूलही तुमच्या वैवाहिक जीवनावर अवाजवी प्रभाव टाकू शकते. तिसरी व्यक्ती तुमच्या नात्यात दखल देत असेल तर नात्यावर परिणाम होऊ शकतो. अविश्वास निर्माण होऊ शकतो. आपलं म्हणणं ऐकलं जात नसेल , आपल्याला प्रथम प्राधान्य मिळत नाही असं एखाद्या व्यक्तीला वाटलं तर नात्यात परिणाम होऊ शकतं.

अविश्वास

विश्वास हा प्रत्येक नात्याचा आधार असतो. नवऱ्याचा बायकोवरचा संशय किंवा बायकोचा नवऱ्यावरचा संशय यामुळे नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. आणि निरोगी नात्यासाठी ते योग्य नाही. ही वृत्ती बदलणे गरजेचे आहे. तुमच्या जोडीदारावर विश्वास ठेवा आणि कोणतीही अडचण आली तर मोकळेपणाने बोला. अनावश्यक संशयामुळे व्यक्ती चिडचिडी होऊ शकते, ज्यामुळे नंतर नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.