‘या’ मीठाच्या पाण्याने करा स्नान, मिळेल जबरदस्त फायदा
पाण्यात एप्सम सॉल्ट टाकून आंघोळ केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात. तसेच आरोग्याच्या अनेक किरकोळ समस्याही दूर होतात.
नवी दिल्ली – एप्सम सॉल्ट (मीठ) (Epsom salt) हे मॅग्नेशियम सल्फेट (MgSO4) म्हणूनही ओळखले जाते. किरकोळ जखम, मुरगळणे आणि वेदनांच्या (pain) उपचारांमध्ये वापरले जाते. एप्सम सॉल्टच्या वापरामुळे स्नायूंना आराम (relaxes muscles) मिळतो आणि जळजळही कमी होते. एप्सम सॉल्ट अथवा एप्सम मीठ हे बहुतांश वैद्यकीय कारणांसाठी वापरले जाते. तसेच एप्सम सॉल्ट बाथचा वापर खूप लोकप्रिय आहे कारण यामुळे अनेक समस्यांपासून आराम मिळतो. हे मीठ पाण्यात टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक समस्या दूर होतात.
एप्सम सॉल्टच्या वापराचे फायदे
बॉडी डिटॉक्स होते
अंघोळीच्या पाण्यामध्ये एप्सम मीठ वापरल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. यामुळे शरीर डिटॉक्स होते व त्वचा चमकते.
ताण कमी होतो
एप्सम सॉल्टमध्ये असलेले मॅग्नेशिअम हे तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते. ते कोमट पाण्यात टाकून आंघोळ केल्याने तणाव कमी होतो.
स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळतो
तुमचे स्नायू दुखत असतील तर एप्सम सॉल्टचा वापर हा खूप फायदेशीर ठरू शकेल. स्नायूंचा थकवा आणि सूज कमी करण्यासाठी हे मीठ खूप उपयुक्त आहे. हलकी दुखापत झाली असेल किंवा हात-पाय मुरगळला असेल, अशावेळी ही ह्या मीठाचा वापर फायदेशीर ठरतो.
रक्ताभिसरण सुधारते
एप्सम सॉल्टमध्ये असलेले मॅग्नेशिअम हे रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवते, ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. शरीरात रक्ताभिसरण चांगले झाल्याने हृदयाचे आरोग्यही चांगले राहते.
मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच एप्सम सॉल्टचा वापर करावा. कारण त्याच्या अतिवापराने त्वचेच्या समस्या निर्माण होऊ शकतात. सतुम्ही ते वापरत असाल तर आधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)