रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी हे आहेत उत्तम मार्ग, आजच आपल्या रुटीनमध्ये करा समावेश
आयुष मंत्रालयाने कोविड -19 संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. (These are the best ways to boost immunity, including in your routine)
मुंबई : प्रतिकारशक्ती वाढविणे आता पूर्वीपेक्षा अधिक महत्वाचे आहे. कोविड -19 विषाणूमुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ राहण्यासाठी हा एक प्रभावी मार्ग आहे. मजबूत प्रतिकारशक्ती असल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल. आयुष मंत्रालयाने कोविड -19 संसर्गापासून बचाव करण्यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करतात. आयुर्वेदात हे उपाय प्रभावी मानले जातात. (These are the best ways to boost immunity, including in your routine)
1. आयुष मंत्रालय घरगुती अन्न खाण्यचा सल्ला देते. जिरे, कोथिंबीर आणि हळद यासारखे मसाल्यांचा जेवणात समावेश करावा. वाळलेले आले आणि लसूण देखील अन्नामध्ये समाविष्ट केले पाहिजे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवळा खाल्ला पाहिजे.
2. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, 20 ग्रॅम च्यवनप्राश दिवसातून दोनदा रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत घ्यावे. रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, हळदीचे दूध पिणे आवश्यक आहे. 150 मि.ली. दूधामध्ये अर्धा चमचा हळद घालून प्यावे.
3. हर्बल चहा किंवा 150 मि.ली. पाण्यात तुळस, दालचिनी, सुकलेले आले आणि मिरपूड यापासून बनवलेला हर्बल चहा किंवा काढा प्यायल्यास रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. यामध्ये आपण गूळ, मनुका आणि वेलची देखील घालू शकता.
4. साधे पाणी किंवा पुदिना किंवा ओव्याच्या पाण्यासोबत स्टीम थेरपी देखील रोग प्रतिकारशक्ती निर्माण करण्याचा एक चांगला मार्ग आहे आणि कोरड्या कफपासून मुक्त होण्यास प्रभावी आहे.
5. आपण दिवसातून एक किंवा दोनदा ऑईल पुलिंग थेरपी करू शकता. एक चमचा नारळ किंवा तिळाचे तेल तोंडात घ्या आणि ते 2-3 मिनिटे फिरवा आणि नंतर थुंकून टाका. कोमट पाण्याने गुळण्या करा. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही नारळ तेल, तिळाचे तेल किंवा गायीचे तूप आपल्या नाकात घालू शकता.
या उपायांव्यतिरिक्त अन्य काही जीवनसत्त्वे आहेत जे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी सर्वोत्तम आहेत.
विटामिन बी 6
रोगप्रतिकारक यंत्रणेत बायोकेमिकल प्रतिक्रियांचे समर्थन करण्यासाठी हे जीवनसत्त्वे महत्त्वपूर्ण आहेत. चिकन आणि कोल्ड वॉटर फिश सारख्या सॅलमन आणि टूना, हिरव्या भाज्या आणि छोले सारखे पदार्थ या व्हिटॅमिनने समृद्ध असतात.
विटामिन ई
व्हिटॅमिन ई एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे जो शरीराला संक्रमणाला प्रभावीपणे सामोरे जाण्यास मदत करतो. व्हिटॅमिन ई समृध्द खाद्यपदार्थांमध्ये नट्स, बियाणे आणि पालकचा समावेश आहे.
विटामिन सी
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप चांगले आहे. संत्री, द्राक्षे, कीनू, स्ट्रॉबेरी, बेल पेपर्स, पालक, केळी आणि ब्रोकोलीसारखे पदार्थ या जीवनसत्त्वाने समृद्ध असतात. (These are the best ways to boost immunity, including in your routine)
व्याजाशिवाय मुदत ठेवींवर 5 फायदे उपलब्ध, संकटाच्या वेळी येणार कामी#FixedDeposit #fixeddepositinsurancecover #FixedDepositInterestrate #fixeddepositrateshttps://t.co/qZrJOpDuDq
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 7, 2021
इतर बातम्या
Video | रश्मी देसाईचा छोट्या स्कर्टमध्ये हॉट डान्स, व्हिडीओ पाहून चाहते नाराज