अंघोळ करताना तुम्हीही या चुका करता का ? मग व्हा सावध, आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
रोजची स्वच्छतेची सवय आणि फ्रेश वाटावं म्हणून आपण रोज अंघोळ करतो. पण त्याच वेळी काही चुका होतात, ज्याकडे दुर्लक्ष होते.
नवी दिल्ली | 12 ऑगस्ट 2023 : स्वच्छतेसाठी आणि फ्रेश वाटावं म्हणून आपण दररोज अंघोळ (taking bath) करतो. पण स्नान करताना काही अशा गोष्टी किंवा चुका होतात, ज्याकडे दुर्लक्ष होते. मात्र याच छोट्या-छोट्या गोष्टी भविष्यात आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. उदा – अंघोळ करताना केमिकलयुक्त साबण किंवा शांपू आण लूफाचा वापर करतो. मात्र त्यामुळे त्वचा खराब होऊ शकते आणि ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरते. अशा आणखी कोणत्या गोष्टी आहेत व त्या सवयी कशा टाळाव्यात, ते जाणून घेऊया.
पाण्याचे तापमान
ऋतूमानानुसार पाण्याचा वापर करावा. कारण खूप थंड किंवा खूप गरम पाणी वापरल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे गरम पाणी वापरण्याऐवजी कोमट पाणी वापरा, तर थंड पाण्याऐवजी सामान्य तापमान असलेले पाणी वापरा.
केमिकल युक्त शांपू आणि साबणाचा वापर टाळावा
बाजारात अनेक प्रकारचे साबण उपलब्ध असतात.तसेच अनेक स्किन केअर प्रॉडक्टही उपलब्ध असतात.ती वापरल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होण्याचा दावा केला जातो. पण या प्रॉडक्ट्समध्ये पॅराबेन आणि सल्फेट सारखी हानिकारक केमिकल्स असतात. जे त्वचेसाठी खूप हानिकारक आहे.
किती वेळ अंघोळ करता हेही महत्वाचे
बाथरूममध्ये जास्त वेळ घालवणे योग्य नसते. आपण जितका वेळ अंघोळ करू, तितकं शरीर स्वच्छ होतं, असा एक गैरसमज आहे. पण हे योग्य नाही. जास्त वेळ अंघोळ केल्याने स्किन खराब होऊ शकते आणि त्वचेचे आजारही होऊ शकतात.
टॉवेलने अंग घासू नका
टॉवेलने अंग जोरात घासल्याने त्वचेचे आजार होऊ शकतात. म्हणूनच असे करणे टाळावे. अशा छोट्या-छोट्या टिप्सचे पालन करणे फायदेशीर ठरते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)