Weight Loss : ऐकावे जनाचे करावे… वजन कमी करण्यासंदर्भातील या 5 मिथकांना भुलू नका !

Weight loss Myths : असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की फळांचे सेवन केल्याने वजन कमी होते. हे वजन कमी करण्याशी संबंधित एक मिथकच आहे. अशी अनेक मिथके वेट लॉसशी जोडलेली आहेत.

Weight Loss : ऐकावे जनाचे करावे... वजन कमी करण्यासंदर्भातील या 5 मिथकांना भुलू नका !
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 07, 2023 | 9:07 AM

नवी दिल्ली : वजन कमी करणं (weight loss) हे काही खायचं काम नाहीये असं बरेच लोक म्हणतात. वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आपण अनेक पद्धतींचा अवलंब करतो. महागडे डाएट प्लॅन्स (diet plans) आणि कठोर वर्कआउटच्या (heavy workout) नवनव्या पद्धतींचा अवलंब करणे सामान्य आहे. काही लोकं तर सोशल मीडियावरील काही व्हिडीओ किंवा पोस्ट्स पाहून तेच डाएट किंवा रूटीन फॉलो करू लागतात. पण वजन कमी करण्यासाठी तसेच चांगल्या आरोग्याशी संबंधित कोणतीही दिनचर्या अवलंबण्यापूर्वी, तज्ञांचा सल्ला घेणे (advice of experts) आवश्यक आहे. स्वत:च्याच मनाने काही उपाय करू नयेत.

असे बरेच लोक आहेत ज्यांना असे वाटते की फळांचे सेवन केल्याने वजन कमी होते. हे वजन कमी करण्याशी संबंधित एक मिथकच आहे. अशी अनेक मिथके वेट लॉसशी जोडलेली आहेत, ज्यावर लोकं सहज विश्वास ठेवतात. अशाच काही मिथकांबद्दल किंवा गैरसमजाबद्दल जाणून घेऊया, जे नुकसान होण्यासही कारणीभूत ठरू शकतात. तुम्हीसुद्धा वेट लॉसच संदर्भातील या गैरसमजुतींवर विश्वास ठेवत नाही ना ?

डिटॉक्सिफाय करणे आहे उत्तम

हे सुद्धा वाचा

आजकाल लोक शरीर डिटॉक्स करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. या लोकप्रिय ट्रेंडमुळे वजन जलदरित्या कमी होते हेही एक मिथक आहे. डिटॉक्सिफायिंगद्वारे, शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात पण जमा झालेली चरबी कमी होत नाही. त्यामुळे या पर्यायाचा अवलंब करून वजन कमी होत नसते.

हर्बल टीमुळे वजन होते कमी

व्हिडिओ आणि ट्रेंडसाठी किंवा शो ऑफ करण्यासाठी अनेक लोक हर्बल टी पिण्यास सुरुवात करतात. त्याच्यामुळे पोटात साठलेली चरबी कमी होऊ लागते असा भ्रम पसरवला जातो. हर्बल टी हा मेटाबॉलिज्म म्हणजेच चयापचय नियंत्रित करण्यास आणि शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते. हर्बल टी पिणे ही चांगली गोष्ट आहे, पण त्यामुळे वजन कमी होऊ शकते, असा भ्रम मनात बाळगणे हे चुकीचे आहे.

वजन कमी करायचे असेल तर स्नॅक्स खाऊ नयेत

स्नॅक्स खाल्ल्याने वजन कमी होण्यात अडचण येते, असे अनेक लोकांना वाटत असते. परंतु तसे नाही. जर तुम्ही केटो डाएट सारख्या आरोग्यदायी दिनचर्येचे पालन करत असाल तर त्यात भाजलेले ड्रायफ्रुट्स खाऊ शकता, पण त्याचे प्रमाण मर्यादित असावे.

पाण्यामुळे कमी होते वजन

अधिकाधिक पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, हा संभ्रमही लोकांमध्ये आहे. पाणी प्यायल्याने भूक लागत नाही हे खरे आहे, पण जास्त पाणी प्यायल्याने आरोग्याला हानी पोहोचते. वजन कमी करायचं असो किंवा नसो, प्रत्येक व्यक्तीने दिवसभरात ठराविक प्रमाणातच पाणी प्यावं.

फळं खाल्ल्याने वजन कमी होऊ शकते

हेल्दी डाएटसाठी आहारात फळांचा समावेश करणे चांगलं आहे, हे खरं आहे. पण वजन कमी करण्यासाठी रूटीनमध्ये केवळ त्यावर अवलंबून राहणे ही मोठी चूक आहे. फळांमध्ये फायबर असते जे पचन सुधारू शकते, परंतु त्यामुळे वजन लवकर कमी होईल, हे ही एक मिथक आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.