सुरकुत्या कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील ही फेशिअल ऑईल्स

तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर फेशिअल ऑईलचा वापर करता येऊ शकतो.

सुरकुत्या कमी करण्यासाठी गुणकारी ठरतील ही फेशिअल ऑईल्स
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 1:32 PM

नवी दिल्ली – वय वाढत जातं तसं आपल्या चेहऱ्यावर त्याच्या खुणा दिसू लागतात. वाढत्या वयासोबतच त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या (wrinkles) यामुळे तुम्ही वृद्ध दिसू शकता. साधारणपणे या सुरकुत्या दूर करण्यासाठी आपण विविध प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांचा (beauty products) अवलंब करतो. पण ते खूप महाग असतात, आणि वारंवार त्याची गरज पडू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या त्वचेची अधिक चांगली काळजी (skin care) घेण्यासाठी आणि सुरकुत्या मुक्त ठेवण्यासाठी, आपण आपल्या त्वचेची रोज काळजी घेणे महत्वाचे ठरते.

स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त तुम्ही काही फेशिअल ऑईल्सचाही वापर करत त्वचेची काळजी घेऊ शकता. फेशिअल ऑईलमुळे आपल्या त्वचेची आर्द्रता वाढते व ती पुनरुज्जीवित करू शकता. काळाचे चक्र थांबवता आले नाही तरी चांगले स्किन केअर रुटीन अवलंबून तुम्ही कोलेजनला चालना देऊ शकता. काही फेशिअल ऑईल्सबद्दल जाणून घेऊया..

अर्गन ऑईल

हे सुद्धा वाचा

अर्गन ऑइल हे सर्वोत्कृष्ट अँटी-एजिंग तेलांपैकी एक मानले जाते. हे तेल फॅटी ॲसिडस्, अँटी-ऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई ने भरपूर आहे. ते त्वचेवर लावल्याने ती जास्त काळ तरुण ठेवता येते. ते त्वचेवर लावण्यासाठी तुमच्या मॉयश्चरायझरमध्ये अर्गन ऑइलचे एक किंवा दोन थेंब घाला. याशिवाय तुम्ही तुमच्या मेकअप फाउंडेशनमध्ये याचा समावेश करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी सीरम म्हणून हे तेल लावा.

बदामाचे तेल

बदामाचे तेल त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते आणि त्यात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात आणि त्वचा अधिक तरुण बनवण्यास मदत होते. हे तेलत्वचेत खोलवर शोषले जाते आणि त्यामुळे त्वचेवर परिणाम लवकर दिसून येतो. यामुळे सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

किवी ऑईल

हे तेल अँटी-ऑक्सिडंट्स, तसेच सी, के, ई या जीवनसत्त्वांनी युक्त असते. तसेच त्यामध्ये कॉपर, पोटॅशिअम, लिनोलिक ॲसिड आणि ओमेगा-फॅटी ॲसिड सारखे पोषक घटक देखील असतात. यामुळे तुमच्या त्वचेचा कोरडेपणा तर दूर होतोच पण सुरकुत्या आणि बारीक रेषांची चिन्हेही कमी होतात.

नारळाचे तेल

खोबरेल तेल ही निसर्गाची देणगी आहे. त्याचे फायदे जितके मोजावे तितके कमी आहेत. हे तेल डोक्यापासून पायापर्यंत वापरता येते. व्हिटॅमिन ए आणि ई व्यतिरिक्त, त्यात अँटी-ऑक्सिडंट्स देखील असतात. जर तुम्हाला सुरकुत्या कमी करायच्या असतील तर त्वचेला खोबरेल तेलाने मसाज करावा.

जोजोबा ऑईल

जर तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही जोजोबा ऑईलचा वापर करून त्वचा तरूण बनवू शकता. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि मॉयश्चरायझिंग गणधर्म असतात. तसेच त्यामध्ये एक असा घटक असतो जो त्वचेतील आर्द्रता लॉक करण्यास मदत करतो. एवढेच नव्हे तर या तेलाचे अँटी-एजिंग गुणधर्म कोलेजनच्या उत्पादनाला चालना देतात, त्यामुळे त्वचा तरुण आणि हेल्दी बनते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.