Heart Health : स्वस्थ हृदय हवं असेल तर आजपासूनच या पदार्थांचे सेवन करा सुरू

जे लोक हेल्दी डाएट फॉलो करतात, त्यांना हृदयविकाराच्या आजारांचा धोका 31 टक्के कमी असतो. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते जाणून घेऊया.

Heart Health : स्वस्थ हृदय हवं असेल तर आजपासूनच या पदार्थांचे सेवन करा सुरू
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jul 17, 2023 | 3:34 PM

नवी दिल्ली : खराब आहारपद्धती आणि लाइफस्टाइल (diet and lifestyle changes) यामुळे आपल्या हृदयाच्या आरोग्याचे (heart health) नुकसान होताना दिसते. स्ट्रोक आणि हार्ट ॲटॅक (heart attack and stroke) सारख्या आजारांचा धोका आता फक्त वृद्धांनाच नव्हे तर तरूण वयातील व्यक्ती, तसेच लहान मुलांनाही आहे. हृदय स्वस्थ राखण्यासाठी वर्कआऊटसोबतच डाएटचीही त्यात प्रमुख भूमिका असते. हेल्दी डाएट घेतल्याने शरीर तर मजबूत होतेच पण त्यासोबतच रोगांशी अथवा आजारांशी लढण्याची शक्तीही मिळते.

एका संशोधनानुसार, जे लोक हेल्दी डाएट फॉलो करतात, त्यांना हृदयविकाराच्या आजारांचा धोका 31 टक्के कमी असतो. हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते जाणून घेऊया.

अक्रोड

अक्रोडामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते, जे आपल्या शरीराचे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करते. रोज अक्रोड खाल्ल्याने धमन्यांना येणारी सूज कमी होऊ शकते. तसेच अक्रोडातील हेल्दी फॅट्समुळे हृदयही स्वस्थ राहते.

संत्रं

हाय ब्लड प्रेशर हे देखील हृदयविकाराचे एक लक्षण असू शकते. हाय बीपीचा त्रास असेल तर संत्र्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. त्यामध्ये व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त पेक्टिन फायबर असते, जे कोलेस्ट्रॉल कमी करते. हे नियमित खाल्ल्याने हाय बीपीची समस्या देखील दूर होऊ शकते.

अळशी

अळशीमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. अळशीचा डाएटमध्ये समावेश केल्यास ब्लड फ्लो उत्तम राहतो. शरीरातील फायबर आणि फायटोकेमिकल्सची कमतरता पूर्ण करणारी ही अळशी भाजून किंवा इतर पदार्थांता घालून सेवन करता येऊ शकते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. शिवाय त्यामध्ये नायट्रेटही आढळते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी पालक, बीन्स, मोहरी आणि मेथी या भाज्यांचा आहारात समावेश करावा. हे खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता देखील दूर होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.