हिवाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातील ही ठिकाणे खूप प्रसिद्ध, स्वस्त दरात मिळतील सर्व सुविधा

गेल्या काही वर्षांपासून लग्नात अनेक बदल झाले आहेत, आता थीम वेडिंगसोबतच डेस्टिनेशन वेडिंगही करण्याची लोकांना खूप आवड आहे. चला जाणून घेऊया भारतातील काही डेस्टिनेशन वेडिंग्सबद्दल जे खूप प्रसिद्ध असून तुम्हला या ठिकाणी स्वस्त दरात सर्व सुविधा मिळतील.

हिवाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी भारतातील ही ठिकाणे खूप प्रसिद्ध, स्वस्त दरात मिळतील सर्व सुविधा
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 1:41 PM

गेल्या काही वर्षांपासून लग्नात अनेक बदल झाले आहेत, प्रत्येक वर वधूचे स्वप्न असत त्यांचं लग्न हे खूप थाटामाटात झाले पाहिजे. तर यात अनेकजण आता शाही सोहळ्यासारखं लग्न करत तर काही जण थीम ठरवून लग्न करत असतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी नुसार हल्ली लग्नाचे घाट घातले जातात. त्यात आता थीम वेडिंगसोबतच डेस्टिनेशन वेडिंगही करण्याची लोकांना खूप आवड आहे. सेलिब्रिटींनी लोकांना डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्सुक केले आहे. आता बहुतांश मुले-मुली डेस्टिनेशन वेडिंग करण्याला प्राधान्य देत आहेत. अशा तऱ्हेने भारतातील कुर्ग, गोवा, जयपूर, केरळ आणि जिम कॉर्बेट या ठिकाणांना तुम्ही ड्रीम वेडिंग करू शकता. चला जाणून घेऊया भारतातील काही डेस्टिनेशन वेडिंग्सबद्दल.

कूर्ग

आपल्या भारत देशात असे अनेक ठिकाणं आहेत जिथे आपण कधी गेलोच नाही. निसर्गाच्या सानिध्यात मोकळी हवा असलेले कर्नाटक राज्यातील कुर्ग च्या शांत टेकड्यांमध्ये वसलेले हे एक भव्य ठिकाण आहे. येथे तुम्ही शांततेबरोबरच जंगलस्पा, इन्फिनिटी पूल आणि खाजगी धबधब्याचा आनंद घ्याल. याशिवाय ग्लास हाऊस डायनिंग हे देखील एक उत्तम वैशिष्ट्य आहे ज्यामुळे हे ठिकाण लग्नासाठी खूप खास बनते. लग्नसमारंभ आणि बॅचलरेट पार्टीसाठी ग्लास हाऊस हे रेस्टॉरंट येथे नक्की ट्राय करा.

हे सुद्धा वाचा

जिम कॉर्बेट

हिमालयाच्या पायथ्याशी नैनीतालच्या प्रसिद्ध हिल-स्टेशनजवळ वसलेले जिम कॉर्बेट हे निसर्गसौंदर्यासह शांत ठिकाण आहे. येथे तुम्ही नदीच्या काठावर रोमँटिक डिनर, प्रायव्हेट बीबीक्यू आणि स्पाचा आनंद घेऊ शकता. कोसी नदी आणि कॉर्बेट नॅशनल पार्कजवळील जंगलाने वेढलेले हे ठिकाण लग्नासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह

जर तुम्ही समुद्रकिनाऱ्याजवळ डेस्टिनेशन वेडिंगप्लॅन करत असाल तर मुंबईची इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हे ठिकाण तुमच्या वेडिंगसाठी चांगले ठरू शकते. येथे तुम्हाला अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल. या लग्नाच्या ठिकाणी लग्न करणे तुमच्यासाठी एखाद्या स्वप्नापेक्षा कमी नाही. येथे समुद्रकिनाऱ्यावर डोम रूफटॉपमध्ये सूर्यास्ताचा आनंद देखील घेता येतो.

जयपूर

तुमचे जर स्वप्न असेल की तुमचं डेस्टिनेशन वेडिंग हे शाही सोहळ्यासारखं व्हावं तर जयपूरमध्ये ५१,००० स्क्वेअर फूट मेजवानीची जागा आणि सुंदर गार्डनमध्ये शाही विवाह सोहळा खूप खास ठरू शकतो. येथे तुम्ही रॉयल डायनिंग वेडिंगला अतिशय नेत्रदीपक वैशिष्ट्यांमध्ये आणखी खास बनवू शकता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.