Food | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय? थांबा! आधी वाचा याचे दुष्परिणाम…

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

Food | शिळा भात-बटाटा-अंडी खाताय? थांबा! आधी वाचा याचे दुष्परिणाम...
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Follow us
| Updated on: Jan 28, 2021 | 5:09 PM

मुंबई : बरेच लोक उरलेले अन्न दुसर्‍या दिवशी गरम करून खातात. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, काही शिळ्या गोष्टी खाण्याने आपण आजारी पडू शकता. म्हणून नेहमी ताजे अन्न खावे. शिळे अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या शिळ्या खाल्ल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात (this leftover food can make you sick).

अंडी

डॉक्टर कांता शेळके यांनी रीडर डायजेस्टला दिलेल्या माहितीत सांगितले की, ‘अंड्यांमध्ये सर्वाधिक साल्मोनेला असतो.’ साल्मोनेला हा एक प्रकारचा बॅक्टेरिया आहे. जो कच्च्या किंवा अर्धवट शिजलेल्या अंड्यात आढळतो. यामुळे ताप, पोटाचा त्रास किंवा अतिसार सारख्या समस्या उद्भवू शकतात. बरेच लोक अंडी कमी उष्णतेवर शिजवतात, ज्यामुळे त्यातील जीवाणू पूर्णपणे मरत नाहीत आणि पदार्थ शिळे झाल्यावर ते दुप्पट वाढतात.

बटाटा

डॉक्टर शेळके यांच्या मते बटाटे शिजवल्यानंतर बराच वेळ थंड होण्यासाठी ठेवले तर त्यात क्लोस्ट्रिडियम बोटुलिनम नावाच्या बॅक्टेरियांची पैदास होते. या जीवाणूंमुळे बोटुलिझम रोग होऊ शकतो. ज्यामुळे अंधुक दृष्टी, कोरडे तोंड आणि श्वास घेण्यास अडचण यासारख्या समस्या उद्भवतात. हा आजार सामान्यतः मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो. याचप्रमाणे बटाटे मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम करता कामा नये.

पालक

पालकात भरपूर प्रमाणात नायट्रेट असते, जे शिजवल्यावर कॅन्सरोजेनिक नायट्रोसामाइन्स बनते. म्हणून, शिळा पालक पुन्हा गरम करून खाणे टाळा. आरोग्य तज्ज्ञ पालक कच्चा किंवा हलका शिजवून खाण्याची शिफारस करतात. नायट्रेट्स असलेले कोणतेही पदार्थ पूर्ण शिजवून खाऊ नयेत.

उरलेला भात

शिजवलेला तांदूळ अर्थात भात बर्‍याच काळासाठी रूम टेम्प्रेचरवर ठेवल्यामुळे त्यामध्ये बॅसिलस सेरियस बॅक्टेरिया वाढू लागतात. त्यामुळे उरलेला शिळा भात अन्न विषबाधा अर्थात फूड पॉयझनिंग होऊ शकते. भात बनवल्यानंतर काही तासातच तो संपवण्याचा प्रयत्न करा (this leftover food can make you sick).

चिकन

कच्च्या अंडीप्रमाणे कच्च्या कोंबडीमध्येही साल्मोनेला बॅक्टेरिया असतात आणि बराच काळ ठेवल्यास हे बॅक्टेरिया वेगाने वाढू लागतात. हे टाळण्यासाठी प्रथम कोंबडीचे मांस चांगले शिजू द्यावे. मायक्रोवेव्ह केवळ कोंबडीचे मांस गरम करते, ते व्यवस्थित शिजवत नाही. त्यामुळे त्यातील जीवाणू पूर्णपणे काढून टाकले जात नाहीत.

तेलकट पदार्थ

तेलकट पदार्थ पुन्हा गरम केल्याने त्यांच्यात हानिकारक रसायने तयार होतात. जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक असतात. जर तुम्हाला ते खायचेच असेल तर एकतर ते गरम न करताच खावे किंवा मंद आचेवर गरम करावे.

सीफूड

खराब सीफूड खाद्य खाल्ल्यास अन्न विषबाधा होण्याचा धोका वाढतो. आरोग्य तज्ज्ञ म्हणतात की, उच्च तापमानात वारंवार सीफूड गरम केल्याने त्यात बॅक्टेरिया उद्भवू शकतात. त्यामुळे दोन तासांपेक्षा जास्त वेळ सीफूड बाहेर ठेवू नये.

(this leftover food can make you sick)

हेही वाचा :

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.