खोबरेल तेलात ‘ही’ गोष्ट मिसळा अन् सुरकुत्यांना करा बाय-बाय, काय आहे तो पदार्थ ?

केस गळती, केस पांढरे होणे, वाढत्या वयात या समस्यांसह चेहऱ्यावर सुरकुत्याही येऊ लागतात. चेहऱ्यावर तसेच अंगावर सुरकुत्या येणं हे वाढत्या वयात होणाऱ्या नैसर्गिक बदलांचा एक भाग आहे. पण तुमचे वय कमी असताना जर सुरकुत्या दिसायला लागल्या तर ही चिंतेची बाब असू शकते. त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेक लोक घरगुती उपाय करतात.

खोबरेल तेलात 'ही' गोष्ट मिसळा अन् सुरकुत्यांना करा बाय-बाय, काय आहे तो पदार्थ ?
खोबरेल तेला मिसळा हा पदार्थ Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 10:58 AM

वाढत्या वयासोबत आपल्या शरीरात आणि सौंदर्यात अनेक प्रकारचे बदल होतात. केस गळती केस पांढरे होणे त्यासोबतच चेहऱ्यावरती सुरकुत्या देखील यायला लागतात. वाढत्या वयात होणाऱ्या नैसर्गिक बदलांचा सुरकुत्या एक भाग आहे. पण तुमचे वय कमी असताना जर सुरकुत्या दिसायला लागल्या तर ही चिंतेची बाब असू शकते. त्वचा मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी अनेक लोक घरगुती उपाय करतात.

या उपायांमध्ये खोबरेल तेल सर्वात प्रभावी उपाय आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जर खोबऱ्याच्या तेलासोबत आपण अजून एक गोष्ट त्यात मिक्स केली तर त्याचा प्रभाव आणखीन वाढू शकतो. चला आपण जाणून घेऊया ती खास गोष्ट कोणती आहे आणि तिचा काय परिणाम होतो.

खोबरेल तेलाचे चेहऱ्याला फायदे काय ? 

विटामिन ए, अँटिऑक्सिडंट आणि फॅटी ऍसिड खोबरेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे त्वचेला पोषण मिळत त्यासोबतच त्वचेला हायड्रेट ठेवतात आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. खोबरेस तेलाचा नियमित वापर केल्याने चेहऱ्याला चमक येते आणि वृद्धत्वाचा प्रभाव देखील कमी होतो.

सुरकुत्या दूर करण्यासाठी वापरा व्हिटॅमिन ई कॅप्सूल

खोबऱ्याच्या तेलामध्ये एक व्हिटॅमिन ई कैप्सूल टाकल्याने सुरकुत्या दूर करण्यासाठी एक प्रभावी घरगुती औषध तयार होते. व्हिटॅमिन ई एक अतिशय प्रभावी अँटिऑक्सिडंट आहे व्हिटॅमिन ई मुळे त्वचेची आद्रता राखली जाते आणि फ्री रॅडिकल्स मुळे होणारे नुकसान देखील कमी होते.

खोबरेल तेल आणि व्हिटॅमिन ई कसे वापरावे ?

एक चमचा खोबरेल तेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. खोबरेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई कैप्सूल फोडून घ्या. दोन्ही तेल व्यवस्थित मिसळून एक मिश्रण तयार करा. हे मिश्रण रात्री झोपण्याआधी लावणे सगळ्यात जास्त फायदेशीर आहे. सकाळी उठल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा.

काय होतात फायदे ?

त्वचेला पोषण मिळते : खोबऱ्याचे तेल आणि विटामिन ई कैप्सूल याचे मिश्रण त्वचेला पोषण देते.

सुरकुत्या कमी होतात : हे मिश्रण नियमित लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.

रॅडिकल्स पासून संरक्षण : अँटिऑक्सिडंट त्वचेचे बाह्य प्रदूषण आणि सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानीपासूनही संरक्षण करतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.