थायरॉईडच्या रुग्णांनी वजन कमी करण्यासाठी ‘ही’ काळजी घ्यावी!
थायरॉईड रूग्णांना वजनावर नियंत्रण ठेवणे मुश्किल असते. वाढत्या वजनाच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारात काही गोष्टींचे पालन केले पाहिजे. (Thyroid patients should take care of this to lose weight)
नवी दिल्ली : थायरॉईडचा त्रास आहे म्हणून चिंता करीत बसू नका. पुरेशी काळजी घेऊन तुम्ही या व्याधीपासून आराम मिळवू शकता. थायरॉईडचे रुग्ण स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवू शकतात. थायरॉईड ग्रंथी गळ्याच्या आत अगदी फुलपाखराच्या आकारात असते. ही ग्रंथी दोन प्रकारचे हार्मोन्स उत्सर्जित करते. जेव्हा कमी किंवा जास्त हार्मोन्स ग्रंथीच्या बाहेर येऊ लागतात, तेव्हा थायरॉईडचा त्रास होतो. या स्थितीत शरीराच्या सर्व पेशींवर परिणाम होतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये थायरॉईडचे प्रमाण अधिक आहे. संतुलित आहार, योग्य दिनचर्या आणि नियमित आयोडीन सेवन केल्याने थायरॉईडवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. थायरॉईड रूग्णांना वजनावर नियंत्रण ठेवणे मुश्किल असते. वाढत्या वजनाच्या समस्येवर मात करण्यासाठी आहारात काही गोष्टींचे पालन केले पाहिजे. (Thyroid patients should take care of this to lose weight)
फॅटी फिशचे सेवन करा
चरबीयुक्त माशांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडेटिव्ह, अँटी-कार्सिनोजेनिक गुणधर्म असतात. हे गुणधर्म मेंदूला सर्व प्रकारच्या आजारांपासून वाचवतात. यासाठी साल्मन, टुना, हेरिंग्स माशांचे सेवन करु शकता. यात आयोडीनदेखील असते. हे थायरॉईड नियंत्रित करू शकते. तसेच वजन कमी करण्यास याची मदत होते.
फायबरयुक्त पदार्थ खा
आपल्या आहारात फायबर आणि प्रथिनेयुक्त पदार्थांचा अधिक समावेश ठेवा. फायबर भूक कमी करते तर प्रथिनांमुळे ताकद वाढते. फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने भूकेची समस्या दूर होते. बर्याच वेळेस पोट भरले असल्याचे जाणवते.
जास्त पाणी प्या
दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्या. जास्त पाणी प्यायल्यामुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडते. शरीर हायड्रेट राहते. असे म्हटले जाते की जंक पदार्थ पटकन पचत नाहीत. अशा परिस्थितीत शरीरात असलेले टॉक्सिन बाहेर टाकण्यास पाणी उपयुक्त ठरते.
मशरूम खा
मशरूममध्ये व्हिटॅमिन डी, सेलेनियम, जिंक, प्रथिने, अँटीऑक्सिडंट्स, अँटी डायबिटीक, अँटी व्हायरल, अँटी कॅन्सर आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. हे गुणधर्म बर्याच रोगांमध्ये तंदुरुस्त ठेवण्यास फायदेशीर ठरतात. विशेषत: थायरॉईड आणि मधुमेह रूग्णांसाठी मशरुम एक प्रकारचे वरदानच आहे. त्यामुळे आपल्या आहारात नक्कीच मशरूमचा समावेश करा. (Thyroid patients should take care of this to lose weight)
SBI Clerk 1st Waiting List : स्टेट बँक भरतीची लेटिंग लिस्ट जारी, अशी करा डाऊनलोडhttps://t.co/QibZAroumi#sbi |#clerk |#waitingList |#issued |#website
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 22, 2021
इतर बातम्या
Do You Know : जाणून घ्या का करतात लहान मुलांचे जावळ?, काय आहेत याचे फायदे?
सुंदर त्वचेसाठी शरीरावर लावा ‘हा’ नैसर्गिक लेप, होतील आश्चर्यकारक फायदे