ऐन तारुण्यात येऊ नये हार्ट अटॅक तर या सवयी त्वरित अंमलात आणा…

भारतात हृदय रोगाचे पेशंट वाढले आहेत. लोकांची बदलेली आहार शैली आणि लाईफस्टाईल यामुळे हृदय विकाराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी रोजचा एक तास स्वत: ला द्यायला हवा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ऐन तारुण्यात येऊ नये हार्ट अटॅक तर या सवयी त्वरित अंमलात आणा...
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:10 PM

पूर्वीच्या काळात मध्यम वयात किंवा म्हातारपण हृदय विकाराचा झटका यायचा आता मात्र ऐन तारुण्यात लोकांना हृदयाच्या झटक्याचा धोका वाढला आहे. अनेक तरुणांचे मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झालेले आपण पाहीले आहेत. यामुळे तुम्हा चिंता वाटणे सहाजिकच आहे. जर हृदयाला रक्त पुरविणाऱ्या वाहिन्यामध्ये जर बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर त्या आखूड होतात आणि हृदयाला रक्त पुरवठा करताना त्यांच्यावर दाब येत जातो. त्यामुळे ब्लड प्रेशरचा त्रास होतो. त्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे याापासून वाचण्यासाठी आपल्या काही सवयी बदलायला हव्यात…

1. सकस आहार खावा

आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी आपला आहार चांगला हवा. जर आपल्या हृदय रोगांपासून दूर रहायचे असेल तर पॅकबंद अन्न, प्रोसेस्ड फूड, साखर, रेड मिट आणि तळलेले पदार्थ खाणे सोडून द्यावे. या जागी ताज्या भाज्या,फळे, कडधान्ये, मासे या सारखे पदार्थ खावेत.

2. धूम्रपान आणि मद्यपान सोडा

अनेक तरुणांना धूम्रपान आणि मद्य पिण्याची सवय असते. या सवयीचा अतिरेक झाल्यानंतर हृदय विकाराचा त्रास सुरु होतो. त्यामुळे या सवयींपासून दूर रहाणे नेहमीच चांगले असते. त्यामुळे तुमचे आयुष्य निरोगी होते. त्यामुळे जर या सवयी असतील तर तातडीने त्या सोडाव्यात यातच तुमचे भले आहे.

हे सुद्धा वाचा

3.शरीराच्या हालचाली वाढवा

तुम्ही जर एका जागी बसून काम करीत असाल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. एका जागी बसून 8 ते 10 तास काम केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढतो.आपल्या जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही.आपण कितीही बिझी असला तरी दिवसांत एक तास व्यायामासाठी काढायला हवा. आपण हवेतर जिने चढू आणि उतरू शकता. पायी चालण्याचा व्यायाम करु शकता. जेवढ्या तुमच्या फिजिकल एक्टीव्हीटीज वाढतील तेवढा तुम्हाला हृदय रोगाचा त्रास कमी होईल.

4.ताण-तणावापासून दूर राहा

अभ्यास तसेच कामाचा ताण आपल्या अडचणीत आणू शकतो. घरातील इतर टेन्शन किंवा नातेसंबंधाचे टेन्शन जोखीम वाढवू शकते. जर आपल्या हार्ट अटॅकपासून दूर राहायचे असेल तर कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त ताण घेऊ नका. त्यामुळे तुम्हाला त्रास होईल. नेहमी आनंदी राहाण्याचा प्रयत्न करा.विनाकारण अतिताण घेऊ नका त्यामुळे तुम्हालाच त्याचे नुकसान होते. त्यामुळे आनंदी राहा…

( सूचना – ही माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. योग्य माहितीसाठी तुमच्या डॉक्टरांशी सल्लामसलत करा )

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.