वयाच्या तिशीतच फिरून घ्या, ‘या’ 10 ठिकाणी नाही गेला तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल

या लेखात 30 वर्षांच्या आत भारतीय तरुणांनी नक्कीच भेट द्यावी अशी 10 आकर्षक पर्यटन स्थळे सांगितली आहेत. गोवा, अंदमान-निकोबार, सोलंग, कसोल, कुर्ग, सिक्कीम, लेह-लद्दाख, श्रीनगर, केरळ आणि ऋषिकेश या ठिकाणी भेट दिल्यास तरुणांना आयुष्याचा वेगळाच अनुभव मिळेल. प्रत्येक ठिकाणाची वैशिष्ट्ये आणि आकर्षण या लेखात सविस्तरपणे वर्णन करण्यात आली आहेत.

वयाच्या तिशीतच फिरून घ्या, 'या' 10 ठिकाणी नाही गेला तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल
पर्यटन स्थळ
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:32 PM

साधारणपणे कमी वयात खूप फिरण्याची अनेकांना आवड असते. ज्याला फिरायला आवडत नाही असा जगातील एखादाच विरळा असेल. वयाच्या 20 आणि 30 व्या वर्षात व्यक्ती अनेक गोष्टीतून जात असतो. सर्वात कमी वयात तो अधिक प्रवास करत असतो. खरं तर फिरल्याशिवाय जग दिसत नाही. आपण स्वत:मध्ये बदल घडून आणू शकत नाही. फिरण्याने दृष्टी येते. जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोण येतो. त्यामुळे आयुष्य समृद्ध बनतं. परिक्वता येते. आणि काही तरी जिद्द करण्याची उर्मी निर्माण होते. वयाच्या तिशीच्या आतच खूप फिरलं पाहिजे. शिक्षण घेत असतानाच फिरून जीवनाचा अनुभव घेतला पाहिजे. याचा अर्थ जगात फिरायला गेले पाहिजे असं नाही. आपल्या देशातही अशी काही ठिकाणं आहेत की तिकडे फिरल्यावर तुम्हाला जीवनाचा समृद्ध अनुभव मिळेल. ही ठिकाणं कोणती? कोणत्या 10 ठिकाणी गेलं पाहिजे? यावरच आपण चर्चा करणार आहोत.

गोवा

एकदा गोवा पाहूनच या राव. वयाच्या 30 व्या वर्षाच्या आत गोव्याची टूर करा. गोव्याच्या नाईट लाइफचा एक वेगळाच आनंद आहे. गोव्यासारखी नाईट लाइफ जगातील कोणत्याच देशात शोधूनही सापडणार नाही. बीच, चहुबाजूने अथांग पसरलेला समुद्र यंगस्टरला आकर्षित करणार नाही तर नवलच.

हे सुद्धा वाचा

अंदमान-निकोबार

वयाच्या 20-30 मध्ये अंदमान-निकोबारला फिरून या. अत्यंत प्रसिद्ध असं हे पर्यटन स्थळ आहे. ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचं आहे. या ठिकाणी दरवर्षी हजारो पर्यटक येतात. हिरवळ, सुंदर बेट पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे.

सोलंग

साहसी गोष्टी करण्याची आवड असणाऱ्यांसाठी सोलंग ही अप्रतिम जागा आहे. या ठिकाणचं सौंदर्य मनाला मोहून नेतं. नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत सोलंगमध्ये बर्फाची चादर असते. त्यामुळे या ठिकाणी वयाच्या तिशीत आल्यावर तुम्हाला वेगळ आनंद अनुभवता येणार आहे.

कसोल

वयाच्या तिशीतच एकदा कसोलला याच. हे एक अप्रतिम पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी कॅपिंग आणि ट्रॅकिंगचा मोठा आनंद घेऊ शकता. कसोलटचे खीरगंगा ट्रॅक, मलना ट्रॅक, तोष गाव, रिव्हर पार्वती फिरण्यासाठी सर्वात बेस्ट स्थळं आहेत.

कुर्ग

कुर्गमधील अब्बे फॉल, बेरा फॉल रिव्हर, नल्कनाद पॅलेस, ब्रह्मागिरी पीक, नामद्रोलिंग मोनेस्ट्री, इरुप्पू फॉल आणि रिव्हर कावेरी आदी स्थळं फिरण्यासाठी बेस्ट आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत क्वालिटी टाइम घालवू शकता.

सिक्कीम

सिक्कीमचं सौंदर्य सर्वांनाच मोहून टाकतं. या ठिकाणी दर वर्षी लाखो पर्यटक येतात. सिक्कीम भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन आहे. या ठिकाणी वयाच्या तिशीच्या आतच जरूर या.

लेह-लड्डाख

फिरण्याची आवड असणाऱ्यांसाठी लेह- लड्डाख हे सर्वात बेस्ट टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तरुणाईमध्ये हे हिल स्टेशन सर्वात लोकप्रिय आहे. जंस्कार व्हॅली, खरदूंग, ला -पास, हेमिस नॅशनल पार्क आणि स्पीतुक गोम्पा आदी ठिकाणी जाणं एक पर्वणीच असते.

श्रीनगर

श्रीनगरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटलं जातं. उन्हाळ्यात या ठिकाणी फिरणं अत्यंत चांगलं मानलं जातं. या ठिकाणीच डल खोरे, शालीमार बाग, निशात बाग, जामा मशीद, जेन उल आबिदीन मकबरा, शंकराचार्य हिल आणि हजरतबल मशीद पाहून तुमचं मन भरून येईल. त्यामुळे या ठिकाणी आवश्य जा.

केरल

केरळ भारतातील सर्वात सुंदर जागा आहे. टुरिस्ट डेस्टिनेशनपैकी ही एक जागा आहे. केरळला देवाची भूमीही म्हटलं जातं. या ठिकाणचं सौंदर्य प्रत्येकाला मोहून टाकतं. केरळच्या आप एलेप्पी, मुन्नर, वयानंद, कुमाराकोम, कोवालम बीच, बेकल किला, वरकला बीच, कोजीकोड आणि थेक्कडी आदी ठिकाणी तुम्ही फिरू शकता.

ऋषिकेश

उत्तराखंडातील ऋषिकेश हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे. तरुणाईमध्ये ऋषिकेश फेमस आहे. तुम्हाला अॅडव्हेंचर करायचं असेल ट्रॅकिंग आणि राफ्टिंग करायचं असेल तर ऋषिकेशला जायला हवं.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.