केरळमधील ‘हे’ ठिकाण व्हेनिसपेक्षा कमी नाही, भेट देण्याचा करा प्लॅन
केरळ हे अतिशय सुंदर राज्य आहे. निसर्गाच्या सानिध्यात फिरायचे असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. केरळमधील एका ठिकाणाला 'व्हेनिस ऑफ इंडिया' असेही म्हणतात. आपण येथे फिरायला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता.
आपल्या देशात अशी अनेक राज्य आणि ठिकाणे आहेत जिथे अनेक पर्यटक फिरायला जाण्याच्या प्लॅन करत असतात. अनेक ठिकाणं एक्सप्लोर करत असतात. त्यातीलच एक अतिशय रम्य आणि निसर्गाच्या सानिध्यात असलेले ठिकण म्हणजे केरळ. केरळमध्ये खूप सुंदर प्रेक्षणीय स्थळे आहेत. विशेषत: ज्यांना समुद्र किनारे आणि बंधारे आणि त्याच्या अवतीभवती असलेले निसर्ग फिरायला आवडते. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे पर्यटकांची गर्दी असते. येथील निसर्गसौंदर्य लोकांना आकर्षित करते. तर मनाला भुरळ घालते. अश्यातच केरळमधील एका ठिकाणाला व्हेनिस म्हणतात.
तुम्हाला जर तुमच्या जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत निवांतपणे निवांत क्षण घालवायचे असतील तर तुम्ही केरळमधील या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता. हे शहर केरळमधील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथील सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करते. जर तुम्हाला हाऊसबोट क्रूझचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करू शकता.
अलेप्पी
केरळमधील अलेप्पीचे सौंदर्य अतिशय मनमोहक आहे. येथे हजारो हाऊसबोटी आहेत. नारळाच्या झाडांमधून जाण्याची आणि बोटींग करण्याची संधी मिळू शकते. पुन्नामाडा तलाव किंवा अलेप्पी बॅकवॉटरमध्ये हाऊस बोट राइडसाठी खूप प्रसिद्ध आहे. लग्नानंतर जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत शांत ठिकाणी फिरायचं असेल तर तुम्ही अलेप्पीला जाण्याचा प्लॅन करू शकता.
नारळ आणि ताडाची झाडे, बॅकवॉटर, भाताची शेती आणि बोटिंग शिवाय अलेप्पीमधील अनेक सुंदर ठिकाणं पाहण्याची संधीही तुम्हाला मिळू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता.
पांडवन पारा
पांडवन पारा या नावाप्रमाणेच या ठिकाणचा इतिहास पांडवांशी निगडित आहे. वनवासाच्या काळात पांडवांनी १३ वर्षे येथील लेण्यांमध्ये वास्तव्य केले. या ठिकाणाला पांडवांचा खडक म्हणूनही ओळखले जाते. अशा वेळी पिकनिक साठी हे उत्तम ठिकाण आहे. हे ठिकाण प्रमुख आकर्षण स्थळांपैकी एक आहे.
कुट्टनाड
अलेप्पी चे दुसरं प्रसिद्ध ठिकाण असलेल्या कुट्टनाडला जरूर भेट द्या. हे ठिकाण केरळचे तांदळाचे भांडार म्हणूनही ओळखले जाते. येथील जलमार्गांमध्ये कालवे, तलाव आणि छोट्या नद्या आहेत. कुट्टनाड हे बोट राइडसाठी खूप प्रसिद्ध आहे. बोट राइडदरम्यान तुम्हाला निसर्गाचे सुंदर नजारे येथे पाहायला मिळतील.
अलप्पुझा बीच
अलाप्पुझा बीच, ज्याला अलेप्पी बीच देखील म्हणतात. ताडांच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी आणि समुद्रकिनाऱ्याच्या काठावर पिकनिक करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला सर्फिंग, पॅरासेलिंग, बेट रेस आणि मोटर बोट रायडिंग सारख्या साहसी ॲक्टिविटी करण्याची संधी मिळू शकते.