एअर होस्टेस प्रवाशांच्या सर्व मागण्या पू्र्ण करते; पण एक मागणी जी कधीच मान्य करत नाही, चुकून म्हटलात तरी ती होईल नाराज
विमानानं प्रवास करणं हा सर्वांसाठीच एक खास अनुभव असतो. फ्लाईटमध्ये असलेली एअर होस्टेस प्रवाशांना सेवा सुविधा पुरवण्याचं काम करते. मात्र अशीही एक मागणी असते ती कधीच पूर्ण करत नाही.
विमानानं प्रवास करणं हा सर्वांसाठीच एक खास अनुभव असतो. फ्लाईटमध्ये असलेली एअर होस्टेस प्रवाशांना सेवा सुविधा पुरवण्याचं काम करते. तुम्ही विमानात प्रवास करत असताना केवळ एक बटन दाबा फ्लाईटमध्ये असलेली एअर होस्टेस तुमच्या सेवेसाठी तातडीनं हजर होते.एअर होस्टेस प्रवाशांना त्यांच्या प्रत्येक कामात मदत करते. प्रवाशांना आवश्यक असलेली कोणतीही गोष्ट मागणी करताच एअर होस्टेसकडून पुरवली जाते. मात्र अशी देखील एक गोष्ट आहे, ज्याची मागणी प्रवाशांनी केली तर एअर होस्टेस प्रवाशांची ती इच्छा कधीही पूर्ण करत नाही. ती लगेच ती मागणी अमान्य करते. जाणून घेऊयात अशी नेमकी ही कोणती गोष्ट आहे.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार नुकतंच अमेरिकेच्या एका माजी एअर होस्टेसने सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर या गोष्टीबाबत सांगितलं. प्रवाशांनी मागणी करून देखील एअर होस्टेस प्रवाशांची ती इच्छा पूर्ण करू शकत नाही. कॅट कमलानी असं या एअर होस्टेसचं नाव आहे. कॅट कमलानीने सहा वर्ष एअर होस्टेस म्हणून नोकरी केली आहे.तो जॉब सोडून आता कॅट कमलानी एक व्हिडीओ क्रियेटर बनली आहे. सोशल मीडियावर तिचे एक कोटींपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.तीने याबाबत बोलताना आपल्या फॅन्सला सांगितलं की अशी कोणती गोष्टी आहे, जी एअर होस्टेस कधीही पूर्ण करू शकत नाही.
तीने याबाबत बोलताना म्हटलं की, प्रवाशी जेव्हा विमानाने प्रवास करतात तेव्हा त्यांच्याकडे काही सामान किंवा बॅग असते. यातील अनेकांचा हा पहिला विमान प्रवास देखील असतो. प्रवाशी आपल्यासोबत जी बॅग आणतात त्यातील काही प्रवाशांना ती बॅग सीटच्यावर असलेल्या लॉकरमध्ये व्यवस्थित ठेवता येत नाही, किंवा तिथे अॅडजेस्ट होत नाही. अशावेळी प्रवाशी तिथे उपलब्ध असलेल्या एअर होस्टेसला ती बॅग लॉकरमध्ये ठेवण्यास सांगतात. मात्र हा त्यांच्या कामाचा हिस्सा नसल्यामुळे एअर होस्टेस या कामाला अनेकदा नकार देते.पुढे बोलताना कॅट कमलानीने म्हटलं की, हे काम एअर होस्टेसचं नसतं,त्यामुळे याबाबत तिला विचारणं चुकीचं आहे. काही वेळेला एअर होस्टेस तुमची मदत देखील करू शकते, मात्र हे काम तिचं नसल्यामुळे तुम्ही तिला सांगितलं तर ती त्याला नकार देते. तुमचं सामान तुम्हालाच लॉकरमध्ये ठेवावं लागतं.