भारतातील हे 4 रेल्वे मार्ग आहेत सर्वोत्तम, सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी करा ट्रिप प्लॅन

जर तुम्हाला प्रवासाची आवड असेल आणि आपला भारत देश चांगल्या प्रकारे एक्सप्लोर करायचा असेल तर एकदा ट्रेनने प्रवास करून बघा. हा लेख तुम्ही ट्रेनने एक्सप्लोर करणे आवश्यक असलेल्या ठिकाणांबद्दल सांगतो.

भारतातील हे 4 रेल्वे मार्ग आहेत सर्वोत्तम, सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी करा ट्रिप प्लॅन
Train Routes Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 11:43 AM

आपल्या प्रत्येकाच्या लहानपणीच्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात, ज्या आपल्याला मोठं झाल्यावर खूप आठवतात. त्यापैकीच एक म्हणजे रेल्वेचा प्रवास. लहानपणी प्रत्येकाने काही ना काही कारणास्तव रेल्वेने प्रवास केला असेलच. कधी कधी शाळेची सुट्टी असताना आजीच्या घरी जाणे किंवा कुटुंबासमवेत सुट्टीवर जाणे, या काळात प्रत्येकाने रेल्वेने कुठेतरी प्रवास केला असावा. मात्र रेल्वेने प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते, जी मोठ्यांनाही आवडते.

सुट्ट्यांच्या दिवसात बाहेर फिरायला जाताना जर तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य अधिक जवळून पाहायचे असेल तर एकदा या 4 रेल्वे प्रवासापैकी एका प्रवासाचा आनंद जरूर घ्यावा. या दरम्यान तुम्हाला अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारी दृश्ये पहायला मिळतील. आशियाखंडातील सर्वात मोठे रेल्वेचे जाळे हे आपल्या भारतात आहे, ज्यामुळे अशा अनेक ठिकाणांहून रेल्वे जाते, त्यांना पाहण्यासाठी लोक खूप पैसे खर्च करतात. निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यासाठी हा रेल्वे प्रवास उत्तम आहे.

जैसलमेर ते जोधपूर

जैसलमेर ते जोधपूर हा रेल्वेमार्ग ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या थार वाळवंटातून जातो. या वाटेवर तुम्हाला थार वाळवंटाचे अतिशय सुंदर नजारे पाहायला मिळतील. जोधपूर ते जैसलमेर ला जाण्यासाठी डेझर्ट क्वीन ट्रेनने प्रवास करता येतो. वाळवंट ही केवळ पडीक जमीन नाही, हे या रेल्वे ट्रेनने सिद्ध केले आहे. तसं तर वाळवंटात उगवणारा सूर्य पाहण्याची मजा काही औरच असते, जी पाहण्याची संधी फार कमी लोकांना मिळते.

मुंबई ते गोवा

तुम्ही गोव्याला जाणायचा प्लॅन करताय तर तो प्रवास तुम्ही ट्रेनने करा. कारण मुंबई ते गोव्याचा प्रवास करताना तुम्हाला ट्रेनमधून खूप आश्चर्यकारक नजारे पाहायला मिळतील. मुंबई हून गोव्याला जाणारी ट्रेन तुम्हाला एका बाजूला सह्याद्री डोंगर आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचे सुंदर दृश्य दाखवेल. 92 बोगदे आणि 2000 पुलांवरून तुम्हाला घेऊन जाणारी ट्रेन नैसर्गिक सौंदर्याचा जागतिक दर्जाचा अनुभव देणार आहे. इतकंच नाही तर मुंबईहून गोव्याला जाताना दुधसागर धबधबाही पाहायला मिळतो, जो अतिशय सुंदर धबधबा आहे.

जम्मू ते बारामुल्ला

तुम्ही जर जम्मू मध्ये फिरायला गेले असाल तर तुम्ही यावेळी जम्मूहून बारामुल्लाला ट्रेनने प्रवास करा. जम्मू ते बारामुल्ला हा मार्ग देशातील सर्वात आव्हानात्मक मार्गांमध्ये गणला जातो. जर तुम्ही हिवाळ्यात जम्मू-काश्मीरला जात असाल आणि जम्मूहून बारामुल्लाला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला ट्रेनमधून उत्तम बर्फाळ दृश्ये पाहायला मिळतील. विशेष म्हणजे या मार्गावर तुम्हाला अनेक पूल आणि बोगदे दिसतील. डोंगरांनी वेढलेला हा मार्ग चिनाब नदी ओलांडतो. हे दृश्य पाहून तुम्ही कधीच विसरणार नाही.

मंडपम ते रामेश्वरम

मंडपम ते रामेश्वरम हा मार्ग भारतातील सर्वात धोकादायक मार्गांपैकी एक आहे कारण येथे ट्रेनसाठी बांधलेला पूल अतिशय अरुंद आहे. जर तुम्हाला ॲडव्हेंचर आवडत असेल तर हा रेल्वे प्रवास तुमच्यासाठी बेस्ट ठरणार आहे. हा पूल भारतातील दुसरा सर्वात लांब पूल म्हणून ओळखला जातो. हा रस्ता तामिळनाडूतील मंडपम आणि रामेश्वरम यांना जोडतो. मात्र, या रेल्वे प्रवासात तुम्हाला खूप मजा येणार आहे. पुलावरून गाडी गेल्यावर इथली दृश्यं पाहण्यासारखी असतात. कारण पुलाच्या चारही बाजूने असलेला अखंड समुद्र तुमचं लक्ष वेधून टाकेल.

कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.