गोव्याच्या सौंदर्याचा अस्सल खजिना ‘या’ ठिकाणी, तुम्हाला ठाऊक आहे का?

गोवा फक्त नाईट लाईफ आणि बीचेचसाठी प्रसिद्ध नाहीये. गोव्यातील पाच अशी लपलेली किनारे आहेत, जिथे तुम्हाला शांतता आणि निसर्गाचा आनंद मिळेल. बेतालबाटीम, बेटुल, होल्लांत, बटरफ्लाय आणि अगोंडा ही किनारे तुमच्यासाठी एक वेगळाच अनुभव घेऊन येतील. सूर्योदय, सूर्यास्त, कासवे, आणि फुलपाखरे पाहण्याची संधी मिळेल. या शांत किनाऱ्यांवर तुमचा सुट्टीचा आनंद वाढेल.

गोव्याच्या सौंदर्याचा अस्सल खजिना 'या' ठिकाणी, तुम्हाला ठाऊक आहे का?
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 3:18 PM

Goa Tourism Hidden Beach : सागरी किनारा आणि नाईट लाईफसाठी गोवा ओळखला जातो. गोव्यात तुम्ही रात्रभर समुद्र किनाऱ्यावर एन्जॉय करु शकता. देशातूनच नव्हे तर परदेशातून आलेले पर्यटकही या पार्ट्यांमध्ये सहभागी होतात. अथांग सागर आणि नाईट लाइफ यामुळे अनेकांचा ओढा गोव्याकडे असतो. पण गोव्यातील काही ठिकाणे अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. जर तुम्हाला गर्दीपासून आणि गोंधळापासून दूर एखाद्या निसर्गरम्य जागेत जायचं असेल तर तुम्ही या काही बीचवर नक्की जाऊ शकता.

बेतालबाटीम बीच – हा बीच पांढरी वाळू आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. हा बीच गर्दीपासून अत्यंत दूर आहे. या ठिकाणी सूर्य अस्ताला जाताना पाहणं हा एक स्वर्गीय अनुभव असतो. या ठिकाणी असलेली ताजी हवा आणि समुद्राच्या लाटा मनाला आनंद देतात.

💠मुख्य आकर्षण

  • सूर्योदय आणि सूर्यास्त
  • कासवांना पाहण्याची गंमत

बेतूल बीच : बेतूल बीच शांत आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी मच्छिमारांची वस्ती आहे. ताज्या सीफूडसाठीही हा भाग प्रसिद्ध आहे. हिरवळ आणि निळ्या पाण्यासाठी सुद्धा ही जागा प्रसिद्ध आहे.

💠मुख्य आकर्षण

  • शांत वातावरण
  • ताज्या ताज्या मासळीचा आस्वाद

होल्लांत बीच : होल्लांत बीच हे एक छोटं समुद्र तट आहे. ही निसर्ग प्रेमींची खास आकर्षणाची जागा आहे. इथली हिरवळ, स्वच्छ, निळशार पाणी मोहून टाकतं. तुम्ही या बीचवर कुटुंबासोबत वेळ घालवू शकता.

💠मुख्य आकर्षण

  • पोहण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण
  • शांत वातावरण

बटरफ्लाय बीच : बटरफ्लाय बीच गोव्यातील सर्वात अनोखा आणि कुणालाही माहित नसलेला बीच आहे. या बीचवर फुलपाखरांचं साम्राज्य आहे. त्यामुळेच या बीचला बटरफ्लाय बीच असं नाव पडलंय. या बीचवर फक्त नावेच्या माध्यमातूनच जाता येतं.

💠मुख्य आकर्षण

  • विविध प्रजातींची फुलपाखरं
  • डॉल्फिन स्पॉटिंग

अगोंडा बीच : शांत आणि निर्मळ वातावरणासाठी अगोंडा बीच फेमस आहे. या ठिकाणी तुम्हाला सतत समुद्राच्या लाटांची गाज ऐकायला मिळेल. या शिवाय नारळाच्या झाडांची सावली मोहून टाकते. योग आणि ध्यान करण्यासाठी या जागेसारखी दुसरी जागा नाही.

💠मुख्य आकर्षण

  • योग आणि ध्यान
  • पांढरी वाळू

गोव्यातील हे बीच फार कमी लोकांना माहिती आहेत. हे सर्व बीच निसर्गाच्या सानिध्यात काम करत आहे. या बीचवर गेल्यावर आपण गोव्यात आहोत की गोव्याबाहेर हा संभ्रम पडेल. त्यामुळे उद्या जर गोव्याला पिकनिकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या बीचला तुमच्या यादीत समाविष्ट करा.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.