तुमच्या 2025 च्या ट्रॅव्हल डायरीमध्ये भारतातील ‘या’ 5 सुंदर ठिकाणांचा करा समावेश

वर्ष 2025 मध्ये जर तुम्ही तुमच्या व्यस्त आयुष्यातून थोडा वेळ काढून कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखात आम्ही तुम्हाला भारतातील अशी 5 ठिकाणे सांगत आहोत जिथे तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत जाऊ शकता आणि एक वेगळा अनुभव घेऊ शकता.

तुमच्या 2025 च्या ट्रॅव्हल डायरीमध्ये भारतातील 'या' 5 सुंदर ठिकाणांचा करा समावेश
beautiful places of India Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 31, 2024 | 11:45 PM

अवघ्या काही दिवसात २०२५ हे वर्ष सुरू होणार आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन सुरुवात आणि नवीन अनुभवांची संधी आपल्याला मिळत असते. नवीन वर्षात प्रत्येकाला काहीतरी नवीन करून पहायचे असते आणि आपल्या व्यस्त जीवनातून विश्रांती घेऊन काही क्षण दुसऱ्या ठिकाणी घालवायचे असतात. व्यस्त जीवनातून विश्रांती घेण्यासाठी तुम्ही अश्या काही ठिकाणी जाण्याने आराम तर मिळतोच, शिवाय तुम्हाला ऊर्जाही मिळते. आपला भारत देश हा संस्कृती आणि सुंदर देखाव्यांसाठी जगभरात ओळखला जातो. इथल्या प्रत्येक प्रकारच्या प्रवाशासाठी काहीतरी खास आहे. तुम्हाला हिल्स स्टेशन वर जायला आवड असेल, समुद्राच्या लाटांचा आनंद घ्यायचा असेल किंवा वाळवंटात फिरायचं असेल, आपला भारत देश तुम्हाला प्रत्येक अनुभव देतो.

तुम्हाला जर 2025 मध्ये तुमची ट्रॅव्हल डायरी संस्मरणीय बनवायची असेल तर आम्ही भारतातील अशा 5 ठिकाणांची निवड केली आहे, जी तुमच्या यादीत नक्कीच असावीत. ही ठिकाणं सुंदर तर आहेतच, पण इथे तुम्हाला निसर्ग, इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे.

१. लडाखचा रोड ट्रिप

लडाखला रॉड ट्रीपला फिरायला जाण्याचा समावेश सर्वांच्या यादीत होतो. ही जागा खूप सुंदर आहे. लडाखमधील उंच टेकड्या, निळे तलाव आणि बौद्ध संस्कृती हे प्रत्येक क्षण पर्यटकांसाठी खास असते . विश्रांती आणि साहस यांचा उत्तम मिलाफ म्हणजे ही जागा. पँगाँग सरोवर, ज्याची शांतता तुमचे मन मोहून टाकेल. येथे तुम्ही जगातील सर्वात उंच मोटरेबल रस्ता असलेल्या खारदुंगला पासचा आनंद घेऊ शकता. शॉपिंगसाठी तुम्ही लेहच्या मार्केटमध्ये फिरू शकता. इथे गेलात तर तिबेटी मोमोज आणि थुक्पाची चव चाखायला विसरू नका.

२. वायनाडची हिरवळ पाहण्यासारखी आहे

तुम्हाला जर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवायचा असेल तर केरळमधील वायनाड अतिशय सुंदर ठिकाण आहे. या ठिकाणी असलेली हिरवळ, तलाव आणि टेकड्या यांचा सुंदर संगम तुम्ही पाहू शकता. हे ठिकाण तुम्हाला निसर्गाच्या अधिक जवळ आणते. केरळमध्ये अशी अनेक ठिकाणेही पाहण्यासारखी आहेत. जसे की चेंब्रा शिखर, हार्ट शेप तलाव, वायनाड वन्यजीव अभयारण्य आणि एडक्कल लेणी. इथे येऊन मसाल्याच्या बागांमध्ये फिरा आणि केरळच्या पारंपारिक जेवणाचा आस्वाद घ्या.

३. मेघालयमधील ढगांचा आनंद घ्या

पूर्व भारतातील हे राज्य हिरवळ, धबधबे आणि लिविंग रूट्सच्या पुलांसाठी खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणाला “ढगांचे घर” असेही म्हणतात. तुम्ही मेघालय मध्ये गेल्यावर तेथे पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे चेरापुंजी, जे पाऊस आणि सुंदर धबधब्यासाठी ओळखले जाते. तसेच इथले मावलीनोंग पाहण्याजोगा आहे. हे आशियातील सर्वात स्वच्छ गाव म्हणून ओळखले जाते. मेघालयला गेलात तर दावकी नदी अवश्य पहायला हवी, तिचे पाणी इतके स्वच्छ आहे की बोटी हवेत तरंगताना दिसतात.

४. जैसलमेरच्या राजवाड्यांचा आनंद घ्या

‘गोल्डन सिटी’ म्हणून ओळखले जाणारे जैसलमेर वाळूचे डोंगर, किल्ले आणि हवेलीं राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जैसलमेर किल्ला, जिथून संपूर्ण शहराचे सुंदर दृश्य दिसते. सॅम सॅंड ड्युन्स, जिथे उंट सफारी आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. पटवा की हवेली, जी राजस्थानी स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहे. इथल्या राजस्थानी जेवणाचा आस्वाद नक्की घ्या, ज्यात गट्टे की भाजी आणि दालबाटी चूरमा खूप प्रसिद्ध आहेत.

५. अंदमानमधील सागरी दृश्य पहा

तुम्हाला जर समुद्र ठिकणी वेळ घालवायला आवडत असेल तर अंदमानचे स्वच्छ निळे पाणी आणि पांढरे वाळूचे समुद्रकिनारे तुम्हाला स्वर्गासारखे वाटतील. इथे आल्यावर हॅवलॉक बेटावर स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंग करा. येथील राधानगर बीच बघायला विसरू नका, हा आशिया खंडातील सर्वात सुंदर बीचपैकी एक आहे. अंदमान-निकोबारमध्ये सेल्युलर जेल (ब्लॅक वॉटर) देखील आहे.

'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?
नादच खुळा... अँड्रॉइड, आयफोनपेक्षाही महाग कोंबडे, का होतेय चर्चा?.
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ
'मुंब्रा शांत आहे शांत राहूदे', स्थानिकांचा मराठी तरूणाला शिवीगाळ.
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी
वाल्मिक कराडला भेटणाऱ्या तांदळेची संतोष देशमुखांच्या भावालाच अरेरावी.