International Picnic Day : तुम्हीही पिकनिक प्लॅन करताय? मग भारतातल्या 4 सर्वात सुंदर पिकनिक स्टॉटबद्दल वाचाच
International Picnic Day; गेल्या दोन वर्षात अनेकवेळा झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना फार कुठेही जाता येत नव्हते. मात्र यंदा निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता लोक त्यांच्या पिकनिकचे प्लॅन आखू लागले आहेत. विशेषता पावसाळ्यात तर पिकनिक म्हणजे फुल्ल धम्माल असते.
मुंबई : जवळपास सगळ्यांनाच प्रवास (Travel) करायला आवडतो. लोकांना नवीन ठिकाणांना भेट द्यायला, तिथल्या गोष्टींबद्दल जाणून घ्यायला आणि त्यांच्यासोबत अनेक चांगल्या आठवणी परत आणायला आवडतात. मग ते ठिकाण मोठे असो वा लहान पिकनिकचे (International Picnic Day) नाव काढले की प्रत्येकाचा चेहरा आनंदीत होतो. वेळोवेळी लोक त्यांच्या पार्टनरसोबत, मित्रांसोबत, परिवारासोबत पिकनिकचे प्लॅन (Picnic Plan) आखतात. पिकनिकला गेल्याने आपण आपल्या मनाला नवीन ताजेतवाने अनुभवतो, आपल्याला नवीन ऊर्जा मिळते, आपण आपल्या कामाच्या चिंता मागे टाकून थोडा वेळ शांततेत घालवू शकतो. या सर्व गोष्टींसाठी दरवर्षी 18 जून रोजी आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन साजरा केला जातो. गेल्या दोन वर्षात अनेकवेळा झालेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना फार कुठेही जाता येत नव्हते. मात्र यंदा निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता लोक त्यांच्या पिकनिकचे प्लॅन आखू लागले आहेत. विशेषता पावसाळ्यात तर पिकनिक म्हणजे फुल्ल धम्माल असते.
भारतातील 4 उत्तम पर्यटनस्थळे
- शिमला– भारतात शिमला हे खूप चांगले ठिकाण आहे. येथील सौंदर्य आणि निसर्गाची अद्भुत किमया प्रत्येकाला आकर्षित करते. या ठिकाणी तुम्ही बर्फवृष्टीचा आनंद घेऊ शकता, तसेच घोडेस्वारी करताना चांगले फोटो क्लिक करू शकता, पाण्यात राफ्टिंग करू शकता आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड स्टडी येथे देशाचा इतिहास जाणून घेऊ शकता.
- नैनिताल – नैनितालमध्ये वेळ घालवणे एक वेगळा अनुभव देते. तुम्ही याठिकाणी नैनी तलावासह अनेक ठिकाणांना भेटी देऊ शकता. येथे तुम्ही तलावात बोटिंगचा आनंद घेऊ शकता आणि तसेच या डोंगर दऱ्यात सुंदर असे फोटो काढू शकता, इथे राहण्यासाठी बरीच चांगली हॉटेल्स असली तरी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे कॅम्पिंग देखील करू शकता.
- मसुरी-मसुरीमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही पिकनिकचा आनंद घेऊ शकता. येथे तुम्ही गनहिल, केम्पटी फॉल, क्लाउड एंड, लाल टिब्बा, मसूरी लेक, नाग टिब्बा, धनौल्टी, झारीपानी लेक, कॅमल बेक रोड, भट्टा फॉल आणि ज्वाला मंदिर पाहू शकता. ही सर्व ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. दरवर्षी मोठ्या संख्येने लोक आपल्या मित्रांसह येथे पोहोचतात.
- चौपटा-उत्तराखंडमध्ये वसलेला चौपटा स्वर्गापेक्षा कमी नाही. येथे तुम्ही तुंगनाथ, चंद्रशिला, दुगलबिट्टा, कंचुला खरक कस्तुरी मृग अभयारण्य, सारी गाव, देवरिया ताल, रोहिणी बुग्याल, बिसुरीतल, ओंकारेश्वर आणि कालीमठ येथे भेट देऊ शकता. येथील बर्फाच्छादित मैदानांचे नजारे अप्रतिम आहेत.