Travel | IRCTC घडवणार ‘Exotic Goa’ सफर, समुद्र किनाऱ्यावर सनबाथ घेण्यासाठी मोजावे लागतील ‘इतके’ रुपये!
आयआरसीटीसीने (Indian Railway Catering and Tourism Corporation) पर्यटकांसाठी खास ‘Exotic Goa’ ही टूर आयोजित केली आहे.
मुंबई : आयआरसीटीसीने (Indian Railway Catering and Tourism Corporation) पर्यटकांसाठी खास ‘Exotic Goa’ ही टूर आयोजित केली आहे. गोवा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. IRCTCच्या या टूर पॅकेजमध्ये पुरातन पोर्तुगीज कॉलनी, गोव्यातील स्मारके, जंगल, वालुकामय किनारे आणि चविष्ट पाककृतींसह आणखी बर्याचशा ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. पर्यटकांना आयआरसीटीसीच्या या टूर पॅकेजच्या माध्यमातून सगळ्यात स्वस्त दरात गोव्यातील सर्वात आकर्षक ठिकाणांना भेट देता येणार आहे (IRCTC offering Exotic Goa Tour Packages).
‘या’ ठिकाणांची वैशिष्ट्ये :
पोर्तुगीज कॉलनी
पोर्तुगीज हे भारतात येणारे पहिले लोक होते. तो 1510चा कालावधी होता. विजापूरच्या सुलतान युसूफ आदिल शाहचा पराभव केल्यानंतर पोर्तुगीजांनी वेल्हा गोवा (जुना गोवा) ताब्यात घेतला आणि येथे कायम स्वरूपी वसाहत बनवली.
गोव्यातील समुद्र किनारे
गोवा तिथल्या स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी देशभरातच नव्हे, तर जगभरात खूप प्रसिद्ध आहे. येथील काही बीच पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. समुद्रकिनाऱ्यावर बसून सूर्यास्त पाहण्याचा आनंद आपल्या सगळ्यांनाच हवा असतो. सोबत किनाऱ्यावरील हिरवीगार झाडे आणि तेथील आल्हाददायक वातावरण मनाला एक वेगळीच शांती देते.
ख्रिसमस आणि नवीन वर्षाचे उत्सव गोव्यात मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याने बहुतेक लोक डिसेंबर ते मार्च दरम्यान येथे दिसतील. म्हणून या हंगामात येथे पर्यटनासाठी जाणे चांगले आहे. आणि जर तुम्हाला सीफूड आवडत असेल, तर आपणास इथे उत्तम सीफूड मिळू शकेल (IRCTC offering Exotic Goa Tour Packages).
पॅकेजचा तपशील :
– पॅकेजचे नाव : Exotic Goa
– प्रवासाचे साधन : विमान
– सहल कालावधी : 3 रात्री आणि 4 दिवस
– क्लास : कम्फर्ट
– प्रवासाची तारीख : 26 मार्च (अधिक माहितीसाठी IRCTC वेबसाईट तपासावी)
– जेवण योजना : न्याहारी आणि रात्रीचे जेवण सामील
– प्रवासाची सुरुवात : मुंबई
पॅकेजचा खर्च – कम्फर्ट क्लास
कॅटेगरी
– अडल्ट ऑन सिंगल ऑक्यूपंसी : 24300 रुपये
– अडल्ट ऑन डबल ऑक्यूपंसी : 18100 रुपये
– अडल्ट ऑन ट्रिपल ऑक्यूपंसी : 17600 रुपये
– चाईल्ड विथ बेड (2 ते 11 वर्ष) : 14200 रुपये
– चाईल्ड विथआऊट बेड (2 से 11 वर्ष) : 12900 रुपये
(IRCTC offering Exotic Goa Tour Packages)
हेही वाचा :
New Year Celebration | नवीन वर्षाचे निमित्त साधून गोव्याला जाताय? मग ‘ही’ ठिकाणे पाहण्यास विसरू नका!https://t.co/fCellowQMJ#Goa । #GoaVacation । #TopPlaces । #NewYear2021
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2020