आता कमी बजेटमध्ये फिरा उत्तराखंड, ३० हजारापासून पॅकेज सुरु, IRCTC चे खास प्लॅन काय?
गुलाबी थंडीत फिरण्याचा प्लॅन आखताय का? मग चिंता कशाला करताय. आज आम्ही तुमच्यासाठी एक खास पर्याय घेऊन आलो आहोत. तुम्ही कुटुंबासह उत्तराखंडच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. यासाठी IRCTC ने खास प्लॅन आणला आहे? जाणून घेऊया.
तुम्ही या हिवाळ्याच्या हंगामात आपल्या कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, IRCTC तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी घेऊन आली आहे. होय, आपण आपल्या कुटुंबासह उत्तराखंडच्या सौंदर्यासह तेथील तलावांचा आनंद घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी IRCTC चा प्लॅन कोणता आहे? याविषयी विस्ताराने.
हिवाळ्याचा हंगाम असतो आणि तुम्ही उत्तराखंडच्या मैदानी भागाचा सुंदर प्रवास करायला लागले की आपोआप तेही न थकता तुमचा चालण्याचा मूड बनेल. जर तुम्हाला हिवाळ्यात डोंगरात फिरण्याचा छंद असेल तर IRCTC ने तुमच्यासाठी अत्यंत परवडणारे पॅकेज आणले आहे. त्यामुळे ही बातमी संपूर्ण वाचा आणि तुमचा प्लॅन बनवायला लागा.
तुम्ही तुमच्या कुटुंबासह उत्तराखंडची दोन प्रसिद्ध पर्यटन स्थळे नैनीताल आणि जिम कॉर्बेटला भेट देऊ शकाल. निसर्गाला जवळून पाहणाऱ्यांसाठी हा टूर प्लॅन अतिशय उपयुक्त ठरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे टूर पॅकेज आणि प्लॅन कधी करता येईल? याविषयी विस्ताराने.
प्रवास कुठून सुरू होणार?
उत्तराखंडचे प्रसिद्ध पर्यटन स्थळ नैनीताल आणि जिम कॉर्बेट पाहण्यासाठी रोज मोठ्या संख्येने लोक येतात. जर तुम्ही मध्य प्रदेशात राहणार असाल तर IRCTC तुमच्यासाठी उत्तराखंडचा हा प्रवास भोपाळमधून सुरू करणार आहे. 8 डिसेंबरपासून प्रवासाचे नियोजन करू शकता. जर मुंबईतून तुम्ही प्रवास सुरु करणार असाल तर याची माहिती तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवर पाहू शकता. किंवा त्यांना विचारू शकता.
कुठे असेल प्रवास?
IRCTC उत्तराखंड टूर पॅकेजमध्ये, आपल्याला प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट तसेच नैनीताल सरोवरांचे शहर पाहण्याची संधी दिली जात आहे. या ट्रॅव्हल प्लॅनमुळे नैनितालमधील जिम कॉर्बेटमधील बंगाल टायगर आणि ब्रिटिशचं हिल स्टेशन तुम्हाला पाहता येणार आहे. यासोबतच उत्तराखंडमधील एक अतिशय प्रसिद्ध मंदिर नैना देवी देखील तुम्ही पाहू शकता.
किती खर्च येईल?
IRCTC उत्तराखंड टूर पॅकेजसह प्रवास करण्यासाठी तुम्हाला सिंगल ऑक्युपेन्सीसह 75,900 रुपये खर्च करावे लागतील. तर, दोन व्यक्तींमध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 41,600 रुपये खर्च करावे लागतील. याशिवाय जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 33,300 रुपये खर्च करावे लागतील. यामध्ये जर तुम्ही 5-11 वर्षांच्या मुलाला बेड घेऊन आणत असाल तर बेडसह 22,300 रुपये आणि बेडशिवाय 20,800 रुपये मोजावे लागतील. तर इतर ठिकाणावरुन प्रवास करणाऱ्यांनी आणि अधिक तपशीलवार माहितीसाठी तसेच खात्री करून घेण्यासाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाईटवरुन माहिती घेता येईल.