नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळ्याला जाताय? पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना

लोणावळ्यातील नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी पाच जानेवारी 2021 पर्यंत लागू राहणार आहे.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी लोणावळ्याला जाताय? पर्यटकांसाठी महत्त्वाच्या सूचना
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 10:05 AM

पिंपरी चिंचवड : नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांची पावलं आपसूकच हिल स्टेशन्सकडे वळतात. महाराष्ट्रात लोणावळा, माथेरान, महाबळेश्वर अशा थंड हवेच्या ठिकाणी नेहमीच हिवाळी पर्यटनासाठी गर्दी होते. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या पार्श्वभूमीवर तुम्ही लोणावळ्यात पर्यटनाला जाण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. लोणावळ्यात रात्रीची संचारबंदी अर्थात नाईट कर्फ्यू लागू करण्याचे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी लागू केले आहेत. (Lonavala Pune Hill Stations Night Curfew)

लोणावळ्यातील नाईट कर्फ्यूची अंमलबजावणी पाच जानेवारीपर्यंत होणार आहे. लोणावळा शहर, भुशी धरण, अॅम्बी व्हॅली, लवासा, ताम्हिणी घाट, सिंहगड रोड, खडकवासला या पर्यटन स्थळी फार्महाऊस आणि रिसॉर्टवर गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या पर्यटन स्थळांचा संचारबंदीत समावेश करण्यात आला आहे. नाताळ आणि 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी तुम्ही पर्यटनस्थळी जात असाल, तर तुम्हाला रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत बाहेर वावरता येणार नाही.

कोव्हिड19 च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील महापालिका क्षेत्र वगळून तसंच पुणे ग्रामीण क्षेत्रात कलम 144 अंतर्गत 25 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 पर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असेल.

महापालिका हद्दीलगतच्या परिसरात प्रामुख्याने तळेगाव दाभाडे नगर परिषद, चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद, तसेच तळेगाव एमआयडीसी, चाकण म्हाळूंगे एमआयडीसी, हिंजवडी आयटी पार्कचा काही भाग या क्षेत्रात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याचं आदेशात म्हटलं आहे.

5 जानेवारीपर्यंत नाईट कर्फ्यू

राज्यात 22 डिसेंबरपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण यूरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील 15 दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

संबंधित बातम्या :

पुणेकरांनो, ‘विकेंड ट्रीप’चा प्लॅन करताय? जवळची ‘ही’ ठिकाणं तुमची वाट पाहतायत…

कोरेगाव-भीमा शौर्य दिनानिमित्त पुणे-नगर महामार्ग 31 डिसेंबर रोजी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

(Lonavala Pune Hill Stations Night Curfew)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.