Travel | ‘Gods Own Country’ केरळ, चहा आणि मसाल्यांव्यतिरिक्त ‘या’ ठिकाणांसाठी प्रसिद्ध!
चहाचे मळे, बॅकवॉटर्स आणि मसाल्यांच्या लागवडीसारख्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यासाठी केरळ जगभरात प्रसिद्ध आहे. केरळला 'गॉड्स ओवन कंट्री'चा (Gods own Country) दर्जा देण्यात आला आहे.
मुंबई : चहाचे मळे, बॅकवॉटर्स आणि मसाल्यांच्या लागवडीसारख्या अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यासाठी केरळ जगभरात प्रसिद्ध आहे. केरळला ‘गॉड्स ओवन कंट्री’चा (Gods own Country) दर्जा देण्यात आला आहे. हे ठिकाण पर्यटकांसाठी अक्षरशः नंदनवन आहे. येथे आपण दाट जंगले, पर्वत, समुद्र किनारे यासारख्या इतर अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकता. यंदा जर तुम्ही केरळ फिरण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. चला तर, या राज्यातील काही प्रसिद्ध ठिकाणांबद्दल आपण जाणून घेऊया…(Travel Destination Kerala know about best places)
अलेप्पी
अलेप्पी केरळमधील एक शहर आहे. हे शहर बॅकवॉटर आणि समुद्र किनाऱ्यांसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. बॅकवॉटर्स हे केरळ राज्याच्या अर्ध्या भागातून जाणारे निर्जन कालवे, नद्या व तलाव यांचे जाळे आहे. इथली सर्वात लोकप्रिय गोष्ट म्हणजे केट्टूवल्लम अर्थात हाऊस बोट आहे. ज्यात बसून फिरणे आपल्या प्रत्येकालाच आवडते. या हाऊस बोटमधून फेरफटका मारण्यासह चविष्ठ अन्नाचा स्वादही घेता येतो.
थेक्कडी
पेरियार वन्यजीव अभयारण्यांसाठी थेक्कडी सर्वात प्रसिद्ध आहे. ज्याच्या आसपास आपल्याला हत्ती फिरताना दिसतील आणि आपण या हत्तींवर बसून सफारीचा आनंदही घेऊ शकता. या व्यतिरिक्त आपण येथे हिरव्या-गार जंगलाचा आनंद घेऊ शकता. हे स्थान वाईल्ड लाईफ गेटवेसाठी अतिशय योग्य आहे आणि नीलगिरीच्या सुंदर डोंगररांगाही येथे पहायला मिळतात (Travel Destination Kerala know about best places).
कोची
कोची शहर पूर्वी कोचीन म्हणून ओळखली जात असे. केरळची सांस्कृतिक आणि अर्थव्यवस्थेची राजधानी असलेले हे शहर हे देशाचे प्रमुख बंदरचे शहर आहे. हे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करणारे क्रियाकलाप केंद्र आहे. चीनी फिशिंग नेटपासून मसाल्यांच्या लागवडीपर्यंत सगळ्या गोष्टींसाठी केरळ प्रसिद्ध आहे, जिथे प्रत्येक कोपऱ्यात नवीन गोष्टी आढळतील.
मुन्नार
मुन्नार हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. मुन्नार हा भारतातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे. येथे आकाशाला स्पर्श करणारे डोंगर कोणाचेही मन आनंदित करू शकतात. सुंदर धबधबे, प्रकाशित समुद्रकिनारे, वाहणारे पाण्याचे प्रवाह आणि धुक्यांच्या आड लपलेले डोंगर या सगळ्या गोष्टींचा आनंद घेता येईल.
कन्नूर
कन्नूर हे एकेकाळी दक्षिणेकडील ब्रिटिश व्यापार केंद्र होते. त्यापैकी बहुतेक आजही दृश्यमान आहेत. म्हणूनच आजही, कुन्नार शहरात एक संमिश्र सभ्यता दिसून येते. जिथे आपण सेंट अँग्लो फोर्ट पाहू शकता. पय्यामबालम बीच, अरलाम वन्यजीव अभयारण्यामधील वन्यजीव आणि लॅकडाइव्ह समुद्रावरील फेरी राईडचा आनंद घेऊ शकतो.
(Travel Destination Kerala know about best places)
हेही वाचा :
Travel | भारताच्या ‘या’ गावात आजही सुखाने नांदतायत कौरव-पांडवांचे वंशज, तुम्हीही देऊ शकता भेट!#Kalap | #Travel | #Uttarakhand | #Kaurva | #Pandavahttps://t.co/6wlnpVumFW
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 9, 2021