डिसेंबरच्या थंडीत फिरायचा प्लॅन करताय, मग ‘ही’ ठिकाण आहेत उत्तम पर्याय

हिवाळ्याच्या मोसमात बहुतेक लोक कुठेतरी फिरण्याचा बेत नक्कीच आखतात. तसेच डिसेंबर महिन्यात शाळेला सुट्टी असते. अशावेळी लोक नक्कीच कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करतात. हिवाळ्याच्या दृष्टीने सर्वोत्तम पर्यटनस्थळाविषयी आम्ही तुम्हाला सांगतो.

डिसेंबरच्या थंडीत फिरायचा प्लॅन करताय, मग 'ही' ठिकाण आहेत उत्तम पर्याय
Follow us
| Updated on: Nov 26, 2024 | 8:15 AM

Winter Season Travel Tips : सुट्टीचे दिवस सुरु झाले कि प्रत्येकाला फिरायला आवडतं. थंडीचे दिवस सुरु झाले आहे. अशा तऱ्हेने बहुतांश लोकं कुटुंबासोबत कुठेतरी फिरण्याचा बेत नक्कीच आखत असतात. डिसेंबर हा वर्षातील तोच महिना असतो, जेव्हा मुलांना हिवाळ्याच्या सुट्ट्या असतात. आता गुलाबी थंडीलाही सुरुवात झाली आहे. या ऋतूत लोक उबदार ठिकाणी फिरण्याचा बेत आखतात. जर तुम्ही डिसेंबरच्या थंडीत कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करत असाल, तर हा लेख तुमच्यासाठी खास आहे. आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्हाला किंचितही थंडी जाणवणार नाही. या ठिकाणी तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसमवेत आरामात सहलीचे नियोजन करु शकता.

गोवा : डिसेंबरच्या थंडीत तुम्ही गोव्याला जाऊ शकता. या महिन्यात तापमान २१ ते ३२ अंशांपर्यंत असते. या काळात तुम्ही गोव्याला गेल्यावर तुम्हाला थंडी जाणवणार नाही. या हंगामात अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. या ठिकाणी तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर तुमच्या प्रियजनांसह मस्त एन्जॉय करू शकता.

जैसलमेर : लोकप्रिय डेस्टिनेशनमध्ये राजस्थानमधील एखाद्या ठिकाणाचे नाव नसेल असे होऊ शकत नाही. डिसेंबरमध्ये फिरायला जाणार असाल तर जैसलमेरला भेट द्या. या ठिकाणी डिसेंबरमध्ये तापमान २० अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत असते. जैसलमेर किल्ला, पाटों की हवेली, तनोट माता मंदिर आणि गदिसर तलावाला भेट देऊ शकता. हिवाळ्यातील ट्रिप कुटुंबासोबत मस्त फिरू शकता.

गोकर्ण : डिसेंबरमध्ये गोकर्णाचे तापमान २२ ते ३४ अंशांच्या दरम्यान असते. गोकर्णात अनेक भव्य आणि सुंदर समुद्रकिनारे आहेत. गोकर्ण हे हिंदू तीर्थक्षेत्र मानले जाते. येथे भगवान शंकराचे मंदिरही आहे.

‘ही’ ठिकाणंही आहेत परफेक्ट

याशिवाय मुंबई, गुजरातमधील रन ऑफ कच्छ आणि केरळमधील कोवलम यासारख्या ठिकाणांची ट्रिप प्लॅन करू शकता. इथे जाऊन तुम्ही अनेक ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. त्यामुळे यंदाच्या डिसेंबरमध्ये ही डेस्टिनेशन्स चुकवू नका.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.