हिवाळ्यात केसगळती कमी करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय करून पहा.

हिवाळ्यात केस गळण्याची समस्या वाढली असेल तर त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही या लेखात सांगितलेल्या घरगुती उपायांचा वापर करू शकता. हे घरगुती उपाय तुम्हाला केसगळती रोखण्यास मदत करतील.

हिवाळ्यात केसगळती कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पहा.
केस गळण्याची समस्या
Follow us
| Updated on: Jan 13, 2025 | 9:20 AM

हिवाळ्याच्या हंगामात केस गळण्याची समस्या सामान्य असली तरी थंडीच्या दिवसात केस गळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोरडी आणि थंड हवा. त्याचबरोबर यामागे केस गळण्याची अनेक कारणेही असू शकतात. हिवाळ्यात जेव्हा तुम्ही थंड हवेच्या संपर्कात येता तेव्हा वातावरणातील थंडाव्यामुळे केस कमकुवत होतात, ज्यामुळे ते गळू लागतात. याशिवाय थंडीच्या काळात अनेकांना कोंड्याची समस्याही उद्भवते. थंड वातावरणामुळे आपली टाळू कोरडी पडते त्यामुळे केसांमध्ये कोंडा होण्याची समस्या आणि डोक्यात खाज येणे या समस्या तीव्रपणे जाणवू लागते.

बरं केस गळण्याची इतरही कारणं असू शकतात. ते म्हणजे अनेकांच्या हेल्थ कंडिशनमुळे केस गळू लागतात. मात्र केस गळण्याची समस्या हिवाळ्यात जास्त असेल तर याचा अर्थ हे हवामानाचा परिणामामुळे होत आहे. अशावेळी हिवाळ्यात केसगळती कमी करायची असेल तर तुम्ही तुमच्या टाळूची आणि केसांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही हे घरगुती उपाय करा. चला जाणून घेऊयात.

नारळाच्या तेलाने केसांची मालिश करा

नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड असतात जे तुमच्या केसांना पोषण देतात तसेच त्यांना हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. मालिश केल्याने टाळूतील रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतात आणि केसगळती कमी होते. केस धुण्यापूर्वी 5-10 मिनिटे तेलाची मालिश करा आणि 30 मिनिटे ठेवा. सर्वात जास्त फायदेशीर परिणामांसाठी तुम्ही नारळाच्या तेलाने केसांची मालिश करून ते रात्रभर ठेऊन सकाळी उठल्यावर केस स्वच्छ धुवा.

कोरफड जेल लावा

हिवाळयात टाळू कोरडी पडल्यामुळे खूप खाज येते . अशावेळी तुम्ही कोरफड जेलचा वापर करू शकतात. कोरफड जेल टाळूतील खाज शांत करण्यास आणि कोंडा कमी करण्यास मदत करते. कोरफड जेलने मसाज केल्यास केसांमधील ओलावा टिकून राहतो. ज्यामुळे हिवाळ्यात टाळूला कोरडेपणापासून वाचविण्यास मदत होते. तुम्ही कोरफड जेल थेट तुमच्या केसांवर आणि टाळूवर लावू शकता आणि केस धुण्यापूर्वी 20-30 मिनिटे ठेवा.

केस गळण्यापासून रोखण्यासाठी मेथीदाण्यांचा वापर करा

तुमच्या घरातील स्वयंपाक घरात असलेल्या मेथीचे दाणे देखील केस गालांच्या समस्या रोखण्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण मेथीदाण्यांमध्ये प्रथिने आणि इतर संयुगे असतात जी केस मजबूत करतात, त्याचबरोबर कोंडा कमी करतात आणि केसांच्या वाढीस मदत करतात. यासाठी तुम्हाला १-२ चमचे मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्यादिवशी भिजलेल्या मेथीच्या दाण्याची बारीक पेस्ट करा आणि केसांवर आणि टाळूवर लावा. 30 मिनिटे केस असेच ठेवा, नंतर केस धुवा.

कांद्याचा रस

थंडीच्या दिवसात तुमचे देखील टाळूची त्वचा कोरडी पडते व त्यामुळे केस गळू लागलेत तर स्वयंपाक घरातील कांद्याचा रस सरावात गुणकारी आहे. कारण कांद्याचा रस टाळूतील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. इतकंच नाही तर कांद्याचा रस केसगळती कमी करण्यासही मदत करतो. कारण कांद्याच्या रसात सल्फरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे कांद्यापासून रस काढून त्याने केसांची मसाज करा. व केस 30 मिनिटे तसेच ठेवा. त्यानंतर शाम्पू लावून केस स्वच्छ धुवा.

गरम पाण्याने केस धुऊ नका.

हिवाळ्याच्या दिवसात अनेकजण थंडाव्यामुळे कडक गरम पाण्याने केस धुतात. तुम्ही सुद्धा गरम पाण्याने केस धूत असाल तर असे करणे थांबवा. खरं तर गरम पाण्याने केस धुतल्याने केस कोरडे होतात आणि नंतर तुटतात. त्यामुळे हिवाळ्यात नेहमी कोमट पाण्याने केस धुवावे. तसेच केस धुतल्यानंतर ब्लो ड्रायर आणि इतर प्रकारची स्टायलिंग उत्पादने वापरणे टाळा कारण याने केस कोरडे होऊन गळू लागतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.