घनदाट पापण्यांचे गुपित माहित्ये का ? हे उपाय तुम्हीही ट्राय करा ना..
ऑलिव्ह ऑईलमध्ये फेनोलिक कंपाऊंड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पापण्या लांब व घनदाट होतात.
नवी दिल्ली : आपल्या पापण्या लांबसडक आणि घनदाट असाव्यात (long and thick eyelashes) असे प्रत्येक महिलेचे स्वप्न असते. आणि ते का असू नये ? लांब पापण्यांनी डोळ्यांचे व चेहऱ्याचे सौंदर्य वाढते. याचमुळे एखादी पार्टी असो वा इव्हेंट , त्यासाठी तयारी करताना डोळे अधिक आकर्षक दिसावेत म्हणून महिला खोट्या आय-लॅशेसचा वापर करतात.
तसेच आर्टिफिशिअल ट्रीटमेंटद्वारेही पापण्या मोठ्या , लांब व जाड करता येतात. मात्र हे तात्पुरतं असतं आणि त्याचे तोटेही बरेच असतात. त्याऐवजी काही घरगुती उपाय करून तुम्ही लांबसडक पापण्या मिळवू शकता.
ग्रीन टी दाखवेल कमाल
ग्रीन टी मध्ये भरपूर पॉलीफेनॉल असते जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी थंड ग्रीन टी बोटांच्या मदतीने पापण्यांवर लावा. नियमितपणे हा उपाय केल्याने काही दिवसांतच फरक दिसून येईल व तुम्हाला लांब पापण्या मिळतील. तसेच तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता. त्याने डोक्यावरील केसांचीही वाढ होण्यास मदत होईल.
कॅस्टर ऑईल वा एरंडेल तेल
पापण्यांच्या केसांच्या वाढीसाठी कॅस्टर ऑईल अथवा एरंडेल तेल उत्तम ठरते. त्यातील घटक केसांच्या वाढीसाठी उपयोगी ठरतात. ते पापण्यांना पोषणही देतात. कापसाच्या बोळ्यावर थोडे एरंडेल तेल घेऊन ते पापण्यांना नियमित लावा. फरक दिसून येईल.
ऑलिव्ह ऑईलही फायदेशीर
ऑलिव्ह ऑईलमध्ये फेनोलिक कंपाऊंड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे पापण्या लांब व घनदाट होतात. झोपण्यापूर्वी पापण्यांना नियमितपणे ऑलिव्ह ऑईल लावावे.
नारळाचे तेल
नारळाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत. त्यातील अनेक पोषक गुणधर्म केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतात. तसेच त्याच मॉयश्चरायझिंग गुणही असतात, ज्यामुळे पापण्या तुटत नाहीत. झोपण्यापूर्वी कापसावर थोडं खोबरेल तेल घेऊन ते पापण्यांना हलक्या हाताने लावावे, रात्रभर तसेच ठेवावे व सकाळी उठून डोळे स्वच्छ धुवावेत. यामुळे तुमच्या पापण्या लांब व घनदाट होतील.