अहो फक्त पिण्यासाठीच नव्हे , केसांसाठीही चांगला ठरतो कॉफीचा वापर ! मिळतात भरपूर फायदे

Coffee Hair Mask : तुम्ही केसांसाठी कॉफीचा वापर अनेक प्रकारे करू शकता. कॉफी केसांना मऊ आणि चमकदार बनवण्यास मदत करते.

अहो फक्त पिण्यासाठीच नव्हे , केसांसाठीही चांगला ठरतो कॉफीचा वापर ! मिळतात भरपूर फायदे
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Apr 12, 2023 | 2:56 PM

नवी दिल्ली : एक कप कॉफी (Coffee) ही तुम्हाला ऊर्जावान ठेवण्यास मदत करते. पण कॉफीचा केवळ एवढाच उपयोग नाहीये. तुम्ही तुमच्या हेअरकेअर (hair care) रुटीनमध्येही कॉफीचा समावेश करू शकता. ती तुमचे केस चमकदार ठेवण्यास मदत करते. तसेच केस निरोगीही राहतात. कॉफीमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. जे तुमचे केस मऊ (smooth and soft hair) ठेवण्याचे काम करते. केसांसाठी तुम्ही कॉफीचा वापर अनेक प्रकारे करू शकता.

कॉफीमुळे स्काल्पही स्वच्छ राहते. कॉफीच्या वापरामुळे तुमचे केस मुळांपासून मजबूत होतात. कॉफी तुमचे केस जाड आणि मजबूत ठेवते. केसांसाठी तुम्ही कॉफीचा वापर कोणत्या प्रकारे करू शकता ते जाणून घेऊया.

कॉफी विथ कोरफड

हे सुद्धा वाचा

एका भांड्यात एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात 2 ते 3 टेबलस्पून कोरफडीचा रस किंवा जेल घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि टाळू आणि केसांना लावा. हे मिश्रण 30 ते 40 मिनिटे केसांवर राहू द्यावे. त्यानंतर केस सौम्य शांपूने धुवावेत. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय करू शकता.

कॉफी व ऑलिव्ह ऑईल

एका भांड्यात 1 चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात 2 चमचे कोल्ड प्रेस केलेले ऑलिव्ह ऑईल घाला. या दोन्ही गोष्टी नीट मिसळा आणि टाळू आणि केसांना लावा. हा मास्क केसांवर 30 ते 40 मिनिटे राहू द्या. यानंतर केस सौम्य शांपूने धुवा. हा हेअर मास्क केसांना निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत करतो. तुम्ही हा मास्क आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता.

कॉफी आणि दह्याचा हेअर मास्क

मुलायम केस हवे असतील तर कॉफी आणि दही वापरू शकता. अर्धा कप साधे दही घ्या. त्यात एक चमचा कॉफी पावडर घाला. या दोन्ही गोष्टी मिसळा आणि केस आणि टाळूला नीट लावा. 30 ते 40 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस धुवावेत. हा हेअर मास्क तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा वापरू शकता. यामुळे तुमचे केस निरोगी आणि मुलायम राहण्यास मदत होईल.

कॉफी आणि मधाचा वापर

एका बाऊलमध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्या. त्यात 2 ते 3 मोठे चमचे मध घाला. या दोन्ही पदार्थांची पेस्ट बनवून केस आणि टाळूला लावा. हे मिश्रण अर्धा तास तरी केसांवर राहू द्यावे. नंतर शांपूने केस स्वच्छ धुवावेत. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा मास्क वापरू शकता. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते. पोतही चांगला होतो.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.