Cracked Heels Problems: थंडीत पायाच्या भेगांमुळे त्रासलात ? करा ‘हे’ घरगुती उपाय

हिवाळा सुरू होताच अनेक लोकांच्या पायाच्या टाचांना भेगा पडतात. जरी ही समस्या साधारण असली तरी त्याकडे बराच काळ दुर्लक्ष केले तर हा त्रास वाढू शकतो.

Cracked Heels Problems: थंडीत पायाच्या भेगांमुळे त्रासलात ? करा 'हे' घरगुती उपाय
Follow us
| Updated on: Dec 10, 2022 | 11:52 AM

नवी दिल्ली – हिवाळ्यात (winter season) पायाच्या टाचांना भेगा पडण्याची समस्या खूप सामान्य आहे. टाचांना भेगा पडणे (cracked heels) हे केवळ आपल्या पायाच्या आरोग्यासाठीच हानिकारक नव्हे तर त्याचा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर वाईट परिणाम होतो. भेगा पडलेल्या टाचा बऱ्या व्हाव्यात, त्यापासून आराम मिळावा यासाठी अनेक लोक बऱ्याच वेळेस खूप पैसा खर्च करतात. मात्र काही सोप्या आणि घरगुती उपायांनीही (home remedies) हा त्रास बरा होऊ शकतो, हे तुम्हाला माहीत आहे का ? असे काही सोपे उपाय जाणून घेऊया, ज्याचे नियमितपणे पालन केले तर टाचांना भेगा पडण्याची समस्या टाळता येऊ शकते.

हील बाम

टाचांना पडलेल्या भेगांचा त्रास दूर करायचा असेल तर तुम्ही हील बाम वापरू शकता. या बाममध्ये, युरिया, सॅलिसिलिक ॲसिड, अल्फा हायड्रॉक्सी ॲसिड आणि सॅकराइड आयसोमिरेट यांसारखे घटक असणे आवश्यक आहे.

हे सुद्धा वाचा

लिक्विड बँडेज

भेगा पडलेल्या टाचा आणि इन्फेक्शनपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही लिक्विड बँडेज वापरू शकता. हे प्रॉडक्ट स्प्रेच्या स्वरूपात उपलब्ध आहे. तुम्ही ते सहजपणे टाचांवर लावू शकता. भेगा पडलेल्या टाचांच्या दुरुस्तीसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

मध

मध हा केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर भेगा पडलेल्या टाचांसाठीही उपयुक्त ठरतो. टाचांच्या भेगांपासून आराम मिळवण्यासाठी मधाचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. एका अभ्यासानुसार, मधामध्ये काही अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे जखम भरून येते आणि त्वचा मॉइश्चराइज होते. तुम्ही मधाचा वापर घोट्यासाठीही करू शकता.

नारळाचे तेल

कोरडी त्वचा, खाज सुटणे आणि सोरायसिस यांसारख्या त्वचारोगांवर उपचार करण्यासाठी नारळाचे तेल खूप प्रभावी मानले जाते. खोबरेल तेलामध्ये आढळणाऱ्या अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबिअल गुणधर्मांमुळे टाचांना पडलेल्या भेगांपासून आराम मिळू शकतो.

नैसर्गिक उपाय

त्वचा मॉयश्चरायइज केल्याने टाचांना भेगा पडण्याची समस्या उद्भवत नाही. त्वचेच्या मॉयश्चरायझिंगसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑईल किंवा वनस्पती तेल, मॅश केलेली केळी, पॅराफिन वॅक्स किंवा ओट्स मिक्स ऑईल वापरू शकता.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.