Stretch marks : स्ट्रेच मार्क्समुळे आहात हैराण ? या घरगुती उपायांनी मिळेल आराम

आपल्या शरीरावर काही अशा खुणा तयार होतात, ज्या आपण इच्छा असूनही हटवू शकत नाही. अशा खुणा फार वाईट दिसतात. स्ट्रेच मार्क्स हेही त्यापैकी एक आहेत. एखाद्यावेळी आपले वजन वाढले आणि नंतर ते कमी झाले तर शरीराच्या काही भागात स्ट्रेच मार्क्स तयार होतात.

Stretch marks : स्ट्रेच मार्क्समुळे आहात हैराण ? या घरगुती उपायांनी मिळेल आराम
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 3:38 PM

Stretch marks relief : आपल्या शरीरावर काही अशा खुणा तयार होतात, ज्या आपण इच्छा असूनही हटवू शकत नाही. अशा खुणा फार वाईट दिसतात. स्ट्रेच मार्क्स हेही त्यापैकी एक आहेत. एखाद्यावेळी आपले वजन वाढले आणि नंतर ते कमी झाले तर शरीराच्या काही भागात स्ट्रेच मार्क्स तयार होतात. ही समस्या गर्भवती महिलांमध्येही दिसून येते. अनेक वेळा स्ट्रेच मार्क्समुळे महिलांना त्यांचा आवडता ड्रेस घालता येत नाही. साडी नेसली तरी पोटावरील स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसतात. स्ट्रेच मार्क्स दूर करण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. परंतु ती पूर्णपणे प्रभावी ठरत नाहीत.

स्ट्रेच मार्क्स काढून टाकणारी क्रीम काही लोकांच्या त्वचेला सूट होत नाहीत तर काहींना त्यामुळे कधीकधी ॲलर्जी होते. पण घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा वापर करून तुम्ही स्ट्रेच मार्क्सपासून सुटका मिळवू शकता. कोणत्या घरगुती उपायांमुळे स्ट्रेच मार्क्सपासून मुक्तता होऊ शकते ते जाणून घेऊया.

बदामापासून तयार करा नैसर्गिक स्क्रब

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धत वापरून घरच्या घरी स्क्रब तयार करू शकता. यासाठी एका वाटीत बदाम पावडर, साखर, कॉफी आणि खोबरेल तेल घ्या. नंतर ते नीट मिसळा आणि चांगली पेस्ट तयार करा. दररोज आंघोळीपूर्वी हा स्क्रब स्ट्रेच मार्क्सवर लावा. काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.

बटाट्याचा रस वापरा

बटाट्याचा रस नैसर्गिक पद्धतीने डाग दूर करण्यासाठी वापरला जातो. वास्तविक, बटाटा ब्लीचिंग एजंट प्रमाणे काम करतो जे डाग हलके करण्यासाठी प्रभावी ठरते. यासाठी एक चमचा बटाट्याच्या रसात कोरफडीचा रस मिसळा आणि ते मिश्रण स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर लावा. हे रोज लावल्याने ते स्ट्रेच मार्क्स हळूहळू कमी होतील.

कॅस्टर ऑईलचा वापर

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी कॅस्टर ऑईल किंवा एरंडेल तेलाचा वापर केला जाऊ शकतो. तसेच ते त्वचेचा रंग सुधारण्याचे काम करते. एरंडेल तेल त्वचेवर थेट लावण्याऐवजी प्रथम थोडे गरम करा. रात्री झोपण्यापूर्वी, ते तेल स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. एरंडेल तेलाऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑईल देखील वापरू शकता.

लिंबाची सालं ठरतील उपयोगी

लिंबाच्या सालीची पावडर अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जाते. ती डाग हलके करण्यासाठी प्रभावी मानले जाते. लिंबाच्या सालीच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. यानंतर, स्ट्रेच मार्क्स असलेल्या भागावर हळूवारपणे स्क्रब करा.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.