Skin care : स्किन ॲलर्जीने त्रस्त ? करून पहा ‘हे’ घरगुती उपाय

आपल्या घरातील रोजच्या वापरातील अनेक पदार्थ त्वचेच्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पोटदुखी असो वा डोकेदुखी, घरगुती उपायांनी या समस्या सहज सुटू शकतात. स्किन ॲलर्जी झाली असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून पहा.  

Skin care : स्किन ॲलर्जीने त्रस्त ? करून पहा 'हे' घरगुती उपाय
Skin care Image Credit source: google
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 7:48 PM

Home remedies : आपल्या घरातील रोजच्या वापरातील अनेक पदार्थ त्वचेच्या विविध समस्यांवर उपाय करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पोटदुखी असो वा डोकेदुखी, घरगुती उपायांनी या समस्या सहज सुटू शकतात. स्किन ॲलर्जी (Skin allergy) ही जरी कॉमन समस्या असली तरी ती झालेल्या व्यक्तीला खूप त्रास सहन करावा लागतो. कोणाला एखादा विशिष्ट पदार्थ खाल्यामुळे ॲलर्जी होते तर कोणाला एखाद्या सौंदर्य प्रसाधनांच्या ( ब्युटी प्रॉडक्ट) वापरामुळे हा त्रास सहन करावा लागतो. खूप खाज सुटणे, त्वचेवर फोड येणे, खाजवल्यामुळे त्वचेवर काळे डाग पडणे (Dark spots),असे परिणामही होतात. फूड ॲलर्जी आणि सौंदर्यप्रसाधनांमुळे होणारी ॲलर्जी या दोन्हींमध्ये खूप फरक असला तरी त्याच्यामुळे होणारा त्रास तितकाच अधिक असतो. त्यापासून सुटका करण्यासाठी डॉक्टर किंवा स्पेशलिस्टशी बोलून, औषधे घेऊन ॲलर्जी आटोक्यात आणता येते. पण कधीकधी घरगुती उपायांनीही (Home remedies) ही समस्या, त्याचा त्रास कमी होऊ शकतो. जाणून घेऊया कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात..

टी ट्री ऑईल

टी ट्री ऑईलमध्ये अनेक ॲंटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे त्वचेला झालेल्या ॲलर्जीला आतून दुरूस्त करतात. त्यामधील ॲंटीबॅक्टेरिल आणि ॲंटी इन्फ्लामेट्री घटकांमुळे स्किन ॲलर्जीचा त्रास दूर होण्यास मदत होते. त्वचेवरील लालसरपणा, रॅशेस हे सर्व दूर करायचे असेल तर दिवसभरात दोनवेळा तरी टी ट्री ऑईल जरूर लावावे. बाजारात हे ऑईल सहज उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या ऑईलचे काही दुष्परिणाम होत नाहीत.

व्हिनेगर

घरगुती उपायांनी स्कीन ॲलर्जीची समस्या सोडवायची असेल तर ॲपल साइडर व्हिनेगरचाही उपयोग करू शकता. त्यामधील अनेक महत्वपूर्ण घटकांमुळे ते एक स्किन केअर एजंट बनले आहे. ॲपल साइडर व्हिनेगरमधील एक ॲसिड, स्कीनवरील रॅशेस, लालसरपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. अंघोळ करताना पाण्यात थोडे ॲपल साइडर व्हिनेगर मिसळून त्या पाण्याने स्नान केल्यास ॲलर्जी दूर होते.

हे सुद्धा वाचा

नारळाचे तेल

त्वचेची निगा राखण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी आपण नेहमीच नारळाचे तेल वापरतो. नारळाच्या तेलातील पोषक घटकांमुळे केस गळणे, तुटणे, कोरडे होणे, पांढरे होणे अशा अनेक समस्या दूर होतात. हेच नारळाचे तेल त्वचेसाठीही खूप गुणकारी आहे. त्यामधील ॲंटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे त्वचेच्या समस्या सहजपणे दूर होतात. तसेच त्यातील मॉइश्चरायझिंग गुणांमुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते. एका वाटीत थोडे नारळाचे तेल घेऊन ते गरम करावे. तेल कोमट झाल्यावर ते त्वचेवर लावून हलक्या हाताने मालिश करावे व थोडा वेळ तसेच राहू द्यावे. नारळाच्या तेलामुळे स्कीन ॲलर्जी हळूहळू कमी होईल.

Non Stop LIVE Update
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?
महाराष्ट्रात मतदानाची वेळ संपली, राज्यात कुठे किती टक्के झालं मतदान?.
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?
मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू, कार्यकर्त्यांमध्ये खळबळ; काय घडलं?.
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?
एक्झिट पोलमध्ये कुणाच्या बाजूने कौल? राज्यात युती की महाविकास आघाडी?.
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके
शरद पवार गटाचे निलेश कराळे मास्तरांना वर्ध्यात मारहाण, काय घडले नेमके.
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?
बारामतीचे लोक शरद पवारांना विसरु शकत नाही, काय म्हणाले युगेंद्र पवार ?.
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड
धनजंय मुंडे यांच्या परळीत राडा, EVM मशिनची जबर तोडफोड.
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप
'त्या' ऑडिओ क्लीपमधील आवाज सुप्रिया आणि पटोले यांचा, अजितदादांचा आरोप.