Dark Underarms : काळसर अंडरआर्म्समुळे वैतागलात ? हे उपाय करून पहा, घामाचा दुर्गंधही होईल दूर

Underarms Whitening At Home : जर तुमच्या अंडरआर्म्सची त्वचा काळी झाली असेल आणि तुम्हाला त्यातून सुटका हवी असेल तर हे सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात.

Dark Underarms : काळसर अंडरआर्म्समुळे वैतागलात ? हे उपाय करून पहा, घामाचा दुर्गंधही होईल दूर
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Aug 23, 2023 | 2:09 PM

नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : अंडरआर्म्स (Dark Underarms) काळेपणामुळे अनेकदा लाजिरवाणं वाटू शकतं. अशा स्थितीत स्लीव्हलेस टॉप किंवा कुर्ता घालण्याआधी अनेक वेळा विचार करावा लागतो. घामाचा दुर्गंध येऊ नये म्हणून आपण डिओडोरंट वापरतो त्यामुळे त्वचा काळी पडते. याशिवाय कधी-कधी घट्ट कपडे घालणे, जास्त धूम्रपान करणे आणि हार्मोनल चेंजेसमुळेही अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लागते.

जर तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल (Dark Underarms Remedy) आणि त्यापासून सुटका हवी असेल तर हे घरगुती उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात

1) बेकिंग सोडा आणि व्हिनेगर

बेकिंग सोडा आणि ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करून अंडरआर्म्सची त्वचा स्वच्छ आणि चमकदार बनवता येते. यासाठी एक चमचा व्हिनेगरमध्ये योग्य प्रमाणात बेकिंग सोडा मिसळून घट्ट पेस्ट बनवा आणि हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा आणि थोडा वेळ ठेवा, नंतर पाण्याने धुवा. नियमित वापराने अंडरआर्म्सचा काळेपणा पूर्णपणे निघून जाईल.

2) बेसन

बेसनाच्या पीठामुळे अंडरआर्म्सचा काळेपणा दूर होतो. यासाठी बेसन, दही आणि लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा आणि अंडरआर्म्सच्या त्वचेवर लावा. ही पेस्ट अर्धा तास तशीच राहू द्यावी , नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. नियमित वापराने फरक दिसून येईल.

3) लिंबू व साखर

लिंबू आणि साखरेचा स्क्रब हा अंडरआर्म्सच्या त्वचेचा काळेपणा दूर करण्यास मदत करतो. यासाठी लिंबू आणि साखरेचा स्क्रब तयार करून ते अंडरआर्म्सवर लावा आणि १५ मिनिटे स्क्रब करा. यामुळे अंडरआर्म्सच्या त्वचेवर साचलेला मळ साफ होईल.

4) लिंबाचा रस

अंघोळ करण्यापूर्वी अंडरआर्म्सवर लिंबाची साल चोळावी. अंघोळीनंतर मॉयश्चरायझर लावावे. लिंबू एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट असून त्याच्या वापराने अंडरआर्म्सचा काळसर पणा जाऊन त्वचेचा रंग उजळतो.

5) गुलाब पाणी व चंदन

गुलाब पाणी व चंदनाची पेस्ट बनवून अंडरआर्म्सवर लावा. नंतर काही वेळाने धुवून. गुलाबपाणी त्वचेला थंड ठेवते आणि चंदनाने अंडरआर्म्सची त्वचा उजळते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.