घरच्या घरी करा ‘हे’ उपाय आणि डार्क सर्कल्सना म्हणा बाय-बाय

खराब जीवनशैलीमुळे अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कल्सची समस्या सतावते. अशा परिस्थितीत काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही डार्क सर्कल्सपासून मुक्ती मिळवू शकता.

घरच्या घरी करा 'हे' उपाय आणि डार्क सर्कल्सना म्हणा बाय-बाय
डार्क सर्कल्स घालवण्याचे उपाय Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 01, 2023 | 10:50 AM

नवी दिल्ली : आजकाल अनेक लोकांना डोळ्यांखाली डार्क सर्कल्सच्या समस्येचा त्रास होतो. जास्त वेळ स्क्रीन पाहणे (watching screen for long time), ताण घेणे आणि पुरेशी झोप न घेणे अशा अनेक कारणांमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल्स (dark circle under eyes) होतात. खराब जीवनशैली आणि अयोग्य आहार यामुळेही आजकाल डार्क सर्कलच्या या समस्येने त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत काही लोक आय क्रीमचा (eye cream) वापर करतात. पण त्याचा फारसा परिणाम होतोच असंही नाही. अशा वेळी तुम्ही काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून डार्क सर्कल्स घालवू शकता.

तुमच्या डोळ्यांखालीलडार्क सर्कल्स दूर करण्यासाठी काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी तुम्ही बदामाचे तेल, एरंडेल तेल, दूध आणि मध अशा घरातील अनेक गोष्टींचा वापर करू शकता.

हे सुद्धा वाचा

बदामाचे तेल आणि एरंडेल तेलाचा वापर ठरू शकतो उपयुक्त

एका भांड्यात बदाम तेल आणि एरंडेल तेलाचे काही थेंब घ्या. ते एकत्र मिसळा. आता हे तेल डोळ्यांखाली लावून काही वेळ मसाज करा. रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करावा. नंतर हे तेल रात्रभर त्वचेवर तसेच राहू द्यावे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर चेहरा साध्या पाण्याने धुवा. तुम्ही हा उपाय दररोज करू शकता. नियमित वापराने डार्क सर्कल्स कमी होतील.

दूध आणि मधाचा वापर

एका बाऊलमध्ये एक चमचा कच्चं दूध घ्या. त्यात एक चमचा मध घाला. या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळा. हे मिश्रण डार्क सर्कल्स प्रभावित भागावर लावून 3 ते 4 मिनिटे मसाज करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर10 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय करू शकता.

बटाट्याचा वापर ठरू शकतो फायदेशीर

एक बटाटा तासभर फ्रीजमध्ये ठेवा. नंतर तो बाहेर काढून त्याच्या गोल चकत्या करा. या चकत्या डोळ्यांवर आणि डार्क सर्कल्स असलेल्या भागावर 10 ते 15 मिनिटे तशाच ठेवाव्यात. नंतर त्या चकत्या काढून थंड पाण्याने डोळे धुवा. तुम्ही दररोज 2 वेळा हा उपाय करू शकता.

कोरफड आणि गुलाब जलाचा पॅक

एका भांड्यात थोडे कोरफडीचे जेल घ्या. त्यामध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाका. हे मिश्रण नीट एकत्र करून डार्क सर्कल्स असलेल्या भागावर लावा व हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर ते त्वचेवर तसेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी साध्या पाण्याने चेहरा धुवा. हे मिश्रण डार्क सर्कल्सवर उपचार करण्यास मदत करेल.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.