पावसाळ्यात वाढला डासांचा उपद्रव ? पळवून लावण्यासाठी हे उपाय करून पहा..
पावसाळ्याच्या ऋतूमध्ये डासांचा उपद्रव वाढतो. हे डास पळवून लावण्यासाठी अनेक लोक बाजारातून विविध स्प्रे किंवा कॉईल्स विकत घेतात. पण त्यामुळे फारसा फायदा होताना दिसत नाही.
Best Ways to Get Rid of Mosquitoes : उन्हाळ्याचा ऋतू संपून आता पावसाळ्याने (monsoon) चांगलाच जोर धरला आहे. गरमी जाऊन गारवा आल्याने सर्वजण सुखावलेत. पण पावसाळ्यासोबतच (rainy season) विविध आजार येतात तसेच डासांचा (Mosquitoes) उपद्रवही वाढतो. हे डास डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासह अनेक आजार पसरवतात, ज्यामुळे बऱ्याच वेळा लोकांना रुग्णालयातही दाख व्हावे लागू शकते. बहुतांश लोक डास पळवण्यासाठी घरात केमिकलयुक्त धूप, कॉईल किंवा काही स्प्रेचा वापर करतात. पण ते दरवळेस यशस्वी ठरतेच असे नाही, तसेच त्याचे अनेक साईड-इफेक्टसही असतात.
मात्र डासांना पळवून लावण्यासाठी काही सोप्या, वैज्ञानिक उपायांचाही अवलंब करू शकतो. ते उपाय कोमते हे जाणून घेऊया.
पावसाळ्यात घराची दार नीट बंद करा. खिडक्या शक्य तितक्या बंद ठेवा. गॅलरीत जाळीचा वापर करा. दिवसा जेव्हा तीव्र सूर्यप्रकाश किंवा कडक ऊन असेल तर तेव्हा खिडक्या उघड्या ठेवा, नंतर आठवणीने बंद करा.
घराच्या आत, किंवा आसपासच्या परिसरात पाणी साठू देऊ नका. जिथे पाणी साठण्याची शक्यता असेल ती जागा स्वच्छ ठेवा. एसी किंवा कूलरचे पाणी बाहेर जाण्यासाठी पाईप लावा. विशेषत: स्टोअर रूम, स्वयंपाकघरात कुठेही पाणी साचू देऊ नका. घरात जास्त धूळ साठू देऊ नका. गरज भासल्यास घरी ड्रायरचाही वापर करा. कुठेही ओलसरपणा राहू देऊ नका.
डासांना पळवून लावण्यास उपयुक्त ठरतात अशी झाडं किंवा इनडोअर प्लांट्स घरात लावा. यामुळे घरात डास येणार नाहीत. लॅव्हेंडर, कॅटनीप, झेंडू, रोझमेरी, लेमनग्रास, तुळस यांसारखी रोपे ही डास पळवून लावण्यास उपयुक्त मानली जातात.
घरात जिथे डास जास्त असण्याची शक्यता आहे तिथे अर्ध लिंबू रापून त्यात 4-5 लवंगा खोचून ठेवाव्यात आणि हे खुल्या जागी ठेवावे. लिंबू आणि लवंगाच्या वासाने डासांना त्रास होतो आणि त्यामुळे ते घरात शिरण्यास धजावत नाहीत.