International Tea Day: तुम्हालाही आहे डोकेदुखीचा त्रास ? हे चहा पिऊन पहा

हलकीशी डोकेदुखी असेल तर गरम चहाच्या एका कपाने बराच आराम मिळतो आणि तुम्हालाही फ्रेश वाटते.

International Tea Day: तुम्हालाही आहे डोकेदुखीचा त्रास ? हे चहा पिऊन पहा
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Dec 15, 2022 | 1:39 PM

नवी दिल्ली – आपल्यापैकी बहुतांश लोकांची सकाळ चहाशिवाय अपूर्ण असते. साधा चहा असो किंवा ब्लॅक टी , सकाळी उठल्यावर एक कप चहा प्यायल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखे वाटतच नाही. मोठ्या प्रमाणात चहाचे उत्पादन करणारे देश 15 डिसेंबर रोजी आंतराराष्ट्रीय चहा दिवस (International Tea Day) साजरा करतात. 2005 सालापासून भारत, श्रीलंका, व्हिएतनाम, इंडोनेशिया, बांग्लादेश, मलेशिया, युगांडा आणि टांझानिया हे देश हा खास दिवस साजरा करतात. खरंतर चहाचे उत्पादन करणाऱ्या बहुतांश देशांमध्ये चहाचे उत्पादन (production) मे महिन्यात सुरू होते. संयुक्त राष्ट्रानेही 21 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय चहा दिवस म्हणून घोषित केला आहे. याचाच अर्थ आपण वर्षातून दोन वेळा आंतरराष्ट्रीय चहा (tea day) दिवस साजरा करू शकतो.

हलकीशी डोकेदुखी असेल तर गरम चहाच्या एका कपाने बराच आराम मिळतो आणि तुम्हालाही फ्रेश वाटते. काही हर्बल चहाबद्दल जाणून घेऊया जे प्यायल्याने तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

आल्याचा चहा – हा चहा भारतात अतिशय लोकप्रिय असून आलं घातलेला चहा प्यायल्याने आरोग्यासंदर्भातील अनेक फायदे मिळतात. त्यामध्ये असलेले शक्तिशाली अँटी-ऑक्सीडेंट्समुळे जळजळ कमी होण्यास मदत होते.

हे सुद्धा वाचा

कॅमोमाइल चहा – या चहाच्या सेवनाने झोप न येणे आणि चिंता यासारख्या समस्यांवर सहज उपचार करता येतात. मात्र असे असले तरी या चहामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होईल की नाही याबद्दल स्पष्ट माहिती नाही. मात्र या चहातील तत्वांमुळे चिंतेमुळे होणारी डोकेदुखी दूर होते.

फीवरफ्यू चहा – शेकडो वर्षांपासून फिव्हरफ्यू हे औषध म्हणून वापरले जात होते. मायग्रेनच्या उपचारासाठी फिव्हरफ्यूचा वापर अनेक अभ्यासांमध्ये प्रभावी सिद्ध झाला आहे. यामुळे मायग्रेन तसेच सामान्य डोकेदुखीमध्ये हे फायदेशीर ठरते.

लवंगयुक्त चहा – इंडोनेशियात आढळणाया आणि जागतिक स्तरावर पिकवल्या जाणाऱ्या लवंगा या अनमोल मानल्या जातात. डोकेदुखी तसेच इतर अनेक वेदना कमी करण्यासाठी शतकानुशतके यांचा वापर केला जातो. त्यासाठी लवंगांमधील अँटीओसिसेप्टिव्ह घटक कारणीभूत ठरतात. त्यामुळे वेदना कमी होतात.

पेपरमिंट चहा – पेपरमिंट उत्पादन सर्वप्रथम मध्य पूर्व आणि युरोपमध्ये घेतले जात होते, मात्र आता हे जगभरात उत्पादित होते. अपचन, सर्दी, खोकला आणि इतर अनेक रोग बरे करण्यासाठी भारतात पेपरमिंटचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. गरम पाण्यात पेपरमिंट टाकून त्याचा चहा बनवला जातो. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

( डिस्क्लेमर- या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. पण कोणताही उपचार करण्याआधी संबंधित आजारातील, तज्ज्ञांचा अथवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.