Skin care : ‘या’ घरगुती फेसपॅकच्या मदतीने हटवा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स

ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून मुक्त होण्यासाठी दरवेळेस ब्युटी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती फेस पॅकची मदत घेऊ शकता.

Skin care : 'या' घरगुती फेसपॅकच्या मदतीने हटवा चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 28, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली : आजकालची जीवनशैली, खाणेपिण्याच्या अयोग्य सवयी, धूळ, प्रदूषण आणि त्वचेची योग्य काळजी न घेणे यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्सची (blackheads and whiteheads problems )समस्या वाढली आहे. यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक ब्युटी पार्लरमध्ये (parlor) जाऊन फेशिअल, कलीनिंग, ब्लीच, अशा अनेक गोष्टींचा अवलंब करतात. पण सर्वांना दरवेळेस पार्लरमध्ये जाणे जमतेच असेही नाही. अशा वेळी ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्सपासून सुटका मिळवण्यासाठी (To get rid of blackheads and whiteheads) तुम्ही घरच्या घरी या सोप्या फेसपॅकची मदत घेऊ शकता.

ब्लॅकहेड्स हटवण्यासाठी फेसपॅक

हे सुद्धा वाचा

ओटमील व दही

ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा ओटमील घ्या. त्यामध्ये दोन चमचे दही घालून ते नीट मिसळा व ते चेहऱ्यावर लावा आणि दहा मिनिटे हलक्या हातांनी मसाज करा. यानंतर गरम पाण्याची वाफ घ्या. चेहरा पुसून मॉइश्चरायझर लावा. यामुळे हळूहळू ब्लॅकहेड्स कमी होताना दिसतील.

चारकोल-बेंटोनाइट क्ले

ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी, ॲक्टिव्हेटेड चारकोलच्या दोन कॅप्सूल्स घ्या. त्यात अर्धा चमचा बेंटोनाइट क्ले आणि एक चमचा पाणी मिसळून घट्ट पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर मास्कप्रमाणे लावा आणि दहा मिनिटे मसाज करा. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

टोमॅटोचा पल्प

चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी टोमॅटोचाही वापर केला जाऊ शकतो. यासाठी टोमॅटोचा पल्प काढा आणि त्यात चिमूटभर हळद घाला. या मिश्रणाने तुमच्या चेहऱ्याला हलक्या हातांनी मसाज करा. नंतर कोरडे होईपर्यंत असेच राहू द्या. वाळल्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.

व्हाइटहेड्स दूर करण्यासाठी उपाय

संत्र्याच्या सालीची पावडर आणि तांदळाचे पीठ

व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी दोन चमचे संत्र्याच्या सालीची पावडर आणि दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या. त्यात दोन चमचे मटाराची पावडर घाला. त्याची घट्ट पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर चांगल्या रितीने लावा. दहा मिनिटे मसाज करून चेहरा धुवा.

मुलतानी माती-बदाम पावडर-ग्लिसरीन

चेहऱ्यावरील व्हाईटहेड्स दूर करण्यासाठी एका भांड्यात एक चमचा मुलतानी माती पावडर घ्या. त्यात एक चमचा बदाम पावडर आणि एक चमचा ग्लिसरीन घाला. याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा आणि हलक्या हातांनी पाच मिनिटे स्क्रब करा. नंतर दहा मिनिटे असेच राहू द्या. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

टी ट्री ऑईल

व्हाईटहेड्सपासून मुक्त होण्यासाठी टी ट्री ऑईल देखील वापरले जाऊ शकते. चेहऱ्याच्या ज्या भागात व्हाईटहेड्स असतील तिथे या तेलाचे चार ते पाच थेंब लावा. नंतर थोडा वेळ हलक्या हातांनी मसाज करून पंधरा मिनिटे तेल असेच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.यामुळे हळूहळू व्हाईटहेड्स कमी होताना दिसतील.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.