शिकेकाईचा ‘असा’ वापर कराल तर केसांच्या समस्या कायमच्या विसराल

खराब जीवनशैली आणि प्रदूषण यांचा आपल्या केसांवर खूप वाईट परिणाम होतो. अशा वेळी तुम्ही केसांसाठी शिकाकाई देखील वापरू शकता. ती केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करते.

शिकेकाईचा 'असा' वापर कराल तर केसांच्या समस्या कायमच्या विसराल
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 22, 2023 | 10:35 AM

नवी दिल्ली : खराब जीवनशैली आणि प्रदूषण यांचा आपल्या केसांवर खूप वाईट (hair damages) परिणाम होतो. बाहेरची धूळ, माती, प्रदूषण तसेच खाण्यात पोषक तत्वांचा अभाव, केसांची नीट निगा न राखणे यामुळे दिवसेंदिवस आपल्या केसांचा पोत बिघडतो, ते पांढरे होतात व गळूही (hair fall) लागतात. केसांची नियमितपणे निगा राखण्यासाठी आपण भरमसाठ उपाय करतो, महागडे शांपू, कंडीशनर वापरतो. पण केसांना आतून पोषण मिळत नसेल तर या सर्व उत्पादनांचाही काही फायदा होत नाही. पूर्वीच्या काळी स्त्रिया केसांना नियमितपणे तेल लावून मालिश (oil massage for hair) करायच्या आणि केस धुण्यासाठी नैसर्गिक उपायांचा वापर करायच्या. त्यापैकीच एक घटक म्हणजे शिकेकाई.

केस निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही शिककाई वापरू शकता. त्यामुळे केसांमधील कोंडा दूर होण्यास मदत होते. तसेच केसगळतीही कमी होते आणि कमकुवत केसांची समस्या दूर होते. केसांच्या समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही शिककाईचा वापर अनेक प्रकारे करू शकता. शिकेकाई तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनवते. रसायनयुक्त पदार्थांऐवजी तुम्ही शिकेकाई वापरू शकता. केसांसाठी शिकेकाईचा विविध प्रकारे वापर कसा कराव, ते जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

डोक्यातील कोंड्या पासून मुक्ती मिळवण्यासाठी

एका बाऊलमध्ये एक चमचा शिकेकाई पावडर घ्या. त्यात 1 चमचा मेथी पावडर, 1 चमचा ऑलिव्ह ऑईल, दही आणि आवळा पावडर घाला. या गोष्टी मिक्स करून केसांना लावा. हे मिश्रण केसांवर 2 ते 3 तास ​​तसेच राहू द्या. यानंतर केस स्वच्छ धुवावेत. या पॅकमुळे कोंडा दूर होण्यास मदत होते. तुम्ही हा पॅक आठवड्यातून एकदा वापरू शकता.

कमकुवत केसांच्या समस्येवर करा मात

एका भांड्यात 2 चमचे शिकेकाई पावडर घ्या. त्यात एक चमचा दही मिसळा आणि फेटून घ्या. ही पेस्ट केसांच्या मुळांशी लावून थोडा वेळ मसाज करा. नंतर ते मिश्रण केसांवर 30 मिनिटे तसेच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत. हा हेअर पॅकही तुम्ही आठवड्यातून एकदा वापरू शकता. यामुळे केसांना पोषण मिळते व ते मजबूत होण्यास मदत मिळते.

केस गळण्याच्या समस्येपासून मिळवा मुक्ती

एका बाऊलमध्ये एक अंडं फोडून घ्या. त्यात शिकेकाई पावडर घाला. या दोन्ही गोष्टी मिक्स करून केसांना लावा. प्रथिने आणि आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध असलेला हा हेअर मास्क तुमचे केस मजबूत करण्यास मदत करतो. तसेच त्यामुळे तुमचे केस निरोगी होतात व केस गळणे कमी करण्यास मदत मिळते.

चमकदार केसांसाठी मास्क

एका भांड्यात 4 चमचे शिकेकाई पावडर घ्या. त्यात मध घाला. हे मिश्रण नीट एकत्र करून तुमचे केस आणि टाळूवर लावा. थोडा वेळ तसेच राहू द्या. यानंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा हेअर मास्क तुमच्या केसांना पोषण देता आणि केस चमकदार आणि मुलायम ठेवण्यास मदत करतो.

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.